Jio Best Plan | जिओ देतंय कमी किंमतीत दररोज 1.5 GB Data अन् अनलिमिटेड कॉलिंग; जाणून घ्या प्लॅन

0
198
Jio Best Plan | reliance jio rs 239 plan vs vodafone idea rs 299 plan check which prepaid plan best you
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Jio Best Plan | सध्या सर्वच कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनचे दर (Jio Best Plan) वाढवले आहेत. रिलायन्स (Reliance), जिओ (Jio), Airtel, तसेच व्होडाफोन- आयडियाने (Vodafone-Idea) आपल्या प्लॅनचा भाव वाढवला असताना अशा परिस्थितीमध्ये कोणत्या कंपनीचा प्लॅन आपणाला उपयोगी पडेल याबाबत वापरकर्ते गोंधळात आहेत. मात्र सध्या आपल्याजवळ Jio आणि व्होडाफोन-आयडियाच्या 300 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या प्लॅनबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे. Jio चा 239 रुपयांचा प्लॅन आहे, तर Vodafone-Idea चा 299 रुपयांचा प्लॅन आहे. तिन्ही कंपनीपैकी जिओ सर्वोत्तम असल्याचे दिसून येते, कारण जिओ कमी किमतीत अधिक लाभ देत आहे. याबाबत जाणून घ्या.

 

काय आहे Jio चा 239 रुपयांचा प्लॅन?
जिओच्या (Jio Best Plan) 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजरला 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. यामध्ये यूजरला दररोज 1.5 GB डेटा (1.5 GB of Data) मिळतो. म्हणजेच एकूण 42 GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये जिओ अ‍ॅप्सचा एक्सेस मिळतो. यामध्ये अधिक बेनिफिट्ससह किंमत खूपच कमी आहे.

Vodafone-Idea चा 299 रुपयांचा प्लॅन –
व्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone-Idea) 299 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह युजर्संना दररोज 1.5 GB डेटा मिळतो. यासोबतच, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. तसेच, यात सर्व Vi Hero Unlimited बेनिफिट्स यांचा समावेश आहे. या अधिक फायद्यात Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delights सारख्या ऑफरचा समावेश आहे. तसेच, Binge All Night ऑफरसह, युजर्स रोज 12 ते सकाळी 6 दरम्यान अमर्यादित डेटा वापरू शकतात. प्लॅन Vi Movies आणि TV Classic च्या ओव्हर-द-टॉप (OTT) फायद्यांसहही येतो. तसेच, कंपनीने किंमत वाढण्यापूर्वी, या प्लॅनची किंमत 249 होती.

 

Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन –
या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे आणि दररोज 1.5 GB डेटा मिळतो.
याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS युजर्सला मिळतात. तसेच.
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाईल इडिशनचे फ्री ट्रायल, फ्री हॅलोट्यून आणि विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे.
हे अतिरिक्त फायदे देखील मिळत असतात.

 

 

Web Title :- Jio Best Plan | reliance jio rs 239 plan vs vodafone idea rs 299 plan check which prepaid plan best you

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weak Immunity Symptom | जर तुमचे शरीर देत असेल ‘हे’ 3 संकेत तर समजून जा की इम्यूनिटी होतेय कमजोर; जाणून घ्या

Amravati News | सेवानिवृत्त PSI ने मृत्यूपुर्वीच ठेवला चक्क 13 व्या चा कार्यक्रम; निमंत्रण पत्रिकाही वाटल्या अन्…

Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; जाणून घ्या आजचा भाव