Weak Immunity Symptom | जर तुमचे शरीर देत असेल ‘हे’ 3 संकेत तर समजून जा की इम्यूनिटी होतेय कमजोर; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Weak Immunity Symptom | बहुतांश लोकांना इम्युनिटीबद्दल अगोदरच माहित आहे. परंतु, कोरोना काळात त्याचे महत्त्व लोकांना समजले. या कारणास्तव लोक इम्युनिटी मजबूत करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण काही वेळा तुमची इम्यून सिस्टम खूप कमकुवत होऊ लागते. त्याची लक्षणे लोकांना समजत नाहीत. (Weak Immunity Symptom)

 

कमकुवत इम्यूनिटी कशी ओळखावी, इम्यूनिटी कमजोर असताना कोणत्या समस्या होऊ शकतात, इम्युनिटी मजबूत करण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, ते जाणून घेवूयात…

 

1. वारंवार सर्दी किंवा इन्फेक्शन
जर वारंवार सर्दीचा त्रास होत असेल किंवा हवामान बदलल्यावर वारंवार सर्दी-खोकला होत असेल तर इम्यूनिटी कमजोर होत असल्याचे हे लक्षण असू शकते. इतकेच नव्हे, कोणत्याही आजाराची लागण अगदी सहजतेने झाली, तरी हे कमजोर इम्यूनिटीचे लक्षण असू शकते.

2. थकवा जाणवणे
विनाकारण थकल्यासारखे वाटत असल्यास किंवा शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास हे कमजोर इम्यूनिटीचे लक्षण आहे. कारण आपली सर्व ऊर्जा रोगांशी लढण्यात खर्च होते, ज्यामुळे थकवा जाणवतो. (Weak Immunity Symptom)

 

3. पोटाच्या समस्या
इम्यूनिटी कमजोर असल्यास पोटाशी संबंधित समस्या होतात. वारंवार ओटीपोटात दुखणे किंवा बद्धकोष्ठता, मळमळ आणि उलट्या ही लक्षणे इम्युनिटी कमजोर असल्याची लक्षणे आहेत. इम्यूनिटी कमजोर असते तेव्हा बॅक्टेरिया शरीरावर सहज हल्ला करतात आणि पोटात जातात. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्या होत राहतात.

 

इम्यूनिटी अशी करा मजबूत

1. सकस आहार घ्या

2. पुरेशी झोप घ्या

3. मल्टीविटामिन्स घ्या

4. मेडिटेशन आणि व्यायाम करा

5. ताण घेऊ नका.

 

 

Web Title :- Weak Immunity Symptom | these symptoms can be signs of weak immunity

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amravati News | सेवानिवृत्त PSI ने मृत्यूपुर्वीच ठेवला चक्क 13 व्या चा कार्यक्रम; निमंत्रण पत्रिकाही वाटल्या अन्…

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ‘कोरोना’ची लागण

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात ! रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने उडवले; 3 जागीच ठार

ना मिनिमम बॅलन्सचे झंझट, ना लागणार चार्ज ! जाणून घ्या कसे उघडायचे Jio Payments Bank Account आणि काय आहेत याचे फायदे?

Pune Navale Bridge Accident | पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात ! रस्त्याकडेला थांबलेल्या तिघांना ट्रकने उडवले; 3 जागीच ठार