Gold Silver Price Today | खूशखबर ! आजही सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; जाणून घ्या आजचा भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील दोन महिन्यापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाली आहे. सध्या देखील सोन्या-चांदीचा भाव हा कमीच आहे. आज (मंगळवारी) सोने आणि चांदीचे दर स्थिर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनं खरेदीसाठी ही एक योग्य वेळ आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,240 रुपयांपर्यंत स्थिर आहे. तर, चांदीची किंमत 62,300 रुपये प्रति किलोपर्यंत स्थिर आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचा भाव स्वस्त आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे. दरम्यान, भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर उतरताना दिसत आहे. गेल्या वर्षी सोन्याचा दर 50 हजाराच्या वर होता. यंदा तोच सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त असल्याने ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. तसेच, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो.

आजचा सोन्याचा भाव – (Gold Price)

पुणे

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,410 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,950 रुपये

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,220 रुपये

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,220 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,220 रुपये

आजचा चांदीचा भाव – 62,300 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 28 december 2021

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Tukaram Supe | ‘मन:स्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटते’ – तुकाराम सुपे

Sharad Pawar | ‘चंद्रकांत पाटलांची दखल महाराष्ट्र घेत नाही’ – शरद पवार