Jio नं 149 रूपयांच्या प्रीपेड ‘प्लॅन’मध्ये केले मोठे बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायंस जिओने आपल्या 149 रुपये किमतीच्या प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. या प्लॅनमध्ये यापुढे कॉलिंगसाठी चार्जेस आकारण्यात येणार नाही. मात्र या प्लॅनची वैधता कमी करण्यात आली असून 28 दिवसांच्या ऐवजी याची वैधता 24 दिवसांची असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या क्रमांकावर फोन करण्यासाठी 300 मिनिटे मिळणार असून यामध्ये जिओटे जिओ अनलिमिटेड कॉलिंग असणार आहे.

काय मिळणार या प्लॅनमध्ये
जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 मिनिटे, दररोज 100SMS आणि दररोज 1.5GB डेटा मिळतो. याआधी या प्लॅनची वैधता हि 28 दिवसांची होती. मात्र आता यापुढे ती 24 दिवसांची असणार आहे. त्याचबरोबर जिओ ऍप्सच्या कॉम्पलिमेंट्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. कंपनीने दुसऱ्या नेटवर्कवर फोन करणाऱ्या ग्राहकांना 6 पैसे/मिनट दर सुरु केले आहेत. जोपर्यंत ट्राय यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही देखील हे चार्जेस लावणार असल्याचे कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपनीकडे ऑल-इन-वन या विभागामध्ये चार प्लॅन असून यामध्ये 222 रुपये, 333 रुपये, 444 रुपये आणि 555 रुपये असे चार प्लॅन असून 222 रुपयांच्या प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा, 1,000 नॉन-जिओ मिनिटे, अनलिमिटेड जिओ -टू-जिओ कॉलिंग देखील असणार आहे. तर 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये नॉन-जिओ कॉलिंगसाठी 3,000 ,रोज 2GB डेटा, अनलिमिटेड जिओ -टू-जिओ असणार आहेत. या सर्व प्लॅन्सची वैधता हि 28 दिवसांसाठी असणार आहेत.

Visit : Policenama.com