Jio Complimentary Plan | Jio देत आहे फ्री डेटा, कॉल आणि SMS, केवळ ‘या’ यूजर्सला मिळेल अनलिमिटेड प्लान, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Jio Complimentary Plan | टेलिकॉम सर्व्हिससाठी आपल्याला मोठा खर्च करावा लागतो. तुम्ही मंथली यूजर असाल तर दर महिन्याला तुम्ही कॉल आणि डेटासाठी ठराविक रक्कम खर्च करता. काही कारणास्तव या सर्व्हिस न मिळाल्यास यूजरर्सला फसवणूक झाल्यासारखे वाटते. (Jio Complimentary Plan)

 

विशेषत: जेव्हा तुम्हाला या सेवांची सर्वाधिक गरज असते. असाच काहीसा प्रकार आसाममध्ये संततधार पावसानंतर झाला. पावसामुळे येथील दूरसंचार सेवा विस्कळीत झाली आहे. यासाठी जिओ प्रभावित युजर्सना मोफत डेटा आणि कॉलिंग सुविधा देत आहे.

 

कंपनीने मेसेजद्वारे युजर्सना ही माहिती दिली आहे. आसाममधील पावसामुळे प्रभावित झालेल्या यूजर्सला जिओ चार दिवसांसाठी मोफत सेवा देत आहे. या ऑफरमध्ये काय काय उपलब्ध असेल ते जाणून घेवूयात. (Jio Complimentary Plan)

जिओकडून मोफत इंटरनेट आणि कॉलिंग
आसाममधील पावसाने प्रभावित भागातील यूजर्सला जिओ चार दिवसांसाठी मोफत सेवा देत आहे. कंपनीच्या या सेवा दिमा हासाओ, कार्बी आंग्लॉन्ग ईस्ट, कार्बी आंग्लॉन्ग वेस्ट, होजाई आणि कचार जिल्ह्यात उपलब्ध असतील. येथे यूजर्सना दररोज 100 एसएमएस आणि रोज 1.5जीबी डेटासह अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळेल.

 

काय म्हणाले जिओ?
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, कंपनीने आसाममध्ये राहणार्‍या जिओ यूजर्सना मेसेज पाठवला आहे.
या मेसेजमध्ये कंपनीने म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खराब हवामानामुळे तुमच्या सर्व्हिस एक्सप्रियन्स प्रभावित झाला आहे.
सदिच्छा म्हणून, आम्ही तुमच्या नंबरवर चार दिवसांसाठी एक मोफत अमर्यादित योजना सक्रिय करत आहोत.

 

जिओने यापूर्वीही अशी पावले उचलली आहेत. ग्राहकांना अमर्यादित योजनेचा लाभ आपोआप मिळेल.
तसेच यासाठी यूजर्सला कोणतेही पेमेंट करावे लागणार नाही. पावसामुळे नुकसान झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

 

Web Title :- Jio Complimentary Plan | jio offers free data unlimited and sms as complimentary plan to assam users

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Excessive Sweating In Air Condition | एअर कंडिशन असूनही घाम येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या

 

7th Pay Commission Pensioners | सरकारने जारी केला अलर्ट, 25 मेपर्यंत उरकून घ्या हे काम; अन्यथा रखडू शकते पेन्शन

 

Pune Crime | सामाजिक सुरक्षा विभागाकडून बिबवेवाडीत गावठी दारुच्या अड्ड्यावर छापा, महिलेसह 3 जणांवर FIR