खुशखबर ! ‘या’ तारखेला सुरु होणार Jio Postpaid Plus सुविधा, ‘या’ ४ खास ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीच्या 42 व्या वार्षिक जनरल मीटिंगमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की जिओचे ३४ कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत. सब्सक्राइबर, नफा आणि रिव्हेन्यूच्या आधारावर जिओ जगातली सर्वात मोठी टेलिकाॅम कंपनी झाली आहे. याचबरोबर त्यांनी कंपनीच्या अनेक नवीन सेवांची घोषणा केली असून यामध्ये त्यांनी जिओच्या सेट टॉप बॉक्सची देखील घोषणा केली. Jio Fiber या इंटरनेट ब्रॉडबँड सेवेची देखील घोषणा केली असून पुढील महिन्यात म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे.

या सेवेचे वैशिष्ट्य म्हणजे जिओचे प्रीमियम ग्राहक हि सेवा रिलीज झाल्याच्या दिवसापासूनच सिनेमा बघू शकतात. यासाठी ७०० रुपयांपासून ते १० हजाररुपयांपर्यंत मासिक खर्च येणार आहे. Jio Fiber या सेवेसाठी आतापर्यंत दीड कोटी नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले असून यासाठी कंपनी जवळपास साडेतीन लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. यावेळी बोलताना अंबानी म्हणाले कि, १ वर्षात संपूर्ण देशात हे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर रिलायंस यापुढे पोस्टपेड सेवांवर अधिक भर देणार असून सध्या या सेवेविषयी कोणतीही माहिती दिलेली नसली तरीही लवकरच हि सेवा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुणासाठी आहे हा प्लॅन
या बैठकीदरम्यान, मुकेश अंबानी यांनी फक्त JioFiber वर लक्ष केंद्रित केलं असून जिओ पोस्टपेड प्लस हि सुविधा JioFiber वापरणाऱ्यांना लवकरच मिळणार आहे.

या आहेत जिओ पोस्टपेड प्लसमध्ये ऑफर

१) जिओ पोस्टपेड प्लस हि एक प्रीमियम सेवा असून जे ग्राहक पर्सनल सेवा घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी हि सुविधा खूप उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे.

२) या सेवेसाठी जिओचे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन तुमच्या चालू असलेल्या सेवेला जिओ पोस्टपेड प्लस सेवेमध्ये पोर्ट करून देतील. हे काम तुम्हाला घरबसल्या करता येणार आहे.

३) मोठ्या घरातील अनेक सदस्य शेयरिंग पोस्टपेड प्लॅन वापरता असतात. आता यामध्ये जिओचे देखील नाव आल्याने नागरिकांना मोठा फायदा मिळणार आहे.

४) जिओ प्लसची हि सुविधा तुम्हाला नवीन फोन घेतल्यानंतर देखील मिळणार आहे.

कधी सुरु होणार Jio Postpaid Plus ?
Jio Fiber या इंटरनेट ब्रॉडबँड सेवेची देखील घोषणा केली असून पुढील महिन्यात म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी या सेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिओ पोस्टपेड प्लस हि सुविधा देखील सुरु करण्यात येणार आहे.