ऐन दिवाळीत ‘Jio’ चा ग्राहकांना ‘झटका’, आता ‘कॉलिंग’साठी लागणार ‘शुल्क’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऐन दिवाळीत रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिली आहे. आता जिओ कॉलिंगसाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. यासंबंधित घोषणा जिओने केली. जिओकडून स्पष्ट करण्यात आले की जिओ ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कवर कॉल करायचा असेल तर त्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे शुल्क मोजावे लागेल. असे असले तरी जिओ वरुन जिओ कॉलिंगसाठी कोणतेही शुल्क नसेल.

जिओने सांगितले, ते 35 कोटी ग्राहकांना सांगू इच्छित आहे की आउटगोइंग ऑफ नेट मोबाइल कॉलवर 6 पैसे प्रति मिनिट शुल्क तोपर्यंत आकारेल जोपर्यंत ट्राय आपले सध्याच्या रेग्युलेशननुसार IUC शुल्क समाप्त करणार नाही. आम्ही TRAI बरोबर सर्व डाटा देऊ, जेणे करुन त्यांना कळेल की शून्य IUC यूजर्सच्या हितार्थ आहे.

सध्या 6 पैसे प्रति मिनिट IUC शुल्क
हे प्रकरण इंटरकनेक्ट यूजेज चार्जशी संबंधित आहे. IUC एक मोबाइल टेलिकॉल ऑपरेटर द्वारे दुसऱ्यांना देण्यात येणारी रक्कम आहे. जेव्हा एखादा टेलिकॉम ऑपरेटरचे ग्राहक दुसऱ्या ऑपरेटर ग्राहकांना आउटगोइंग मोबाइल कॉल करतात तेव्हा आययूसीचे शुल्क कॉल करणाऱ्या ऑपरेटरला मोजावे लागेत.

दोन वेगवेगळ्या नेटवर्कमधील कॉल मोबाइल ऑफ नेट कॉलच्या स्वरुपात ओळखले जातात. ट्राय द्वारे आययूसी शुल्क निश्चित केले जाते, सध्या ते 6 पैसे प्रति मिनिट आहे.

जिओ नेटवर्कवर रोज येतात 40 कोटी मिस्ड कॉल
जिओ नेटवर्कवर मोफत व्हाॅईस कॉलिंग आणि 2 जी नेटवर्कवर अधारित टॅरिफ होण्याच्या कारणाने एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे 30 – 40 कोटी 2 जी ग्राहक जिओ ग्राहकांना मिस्ड कॉल देतात. जिओ नेटवर्कवर रोज 25 ते 30 कोटी मिस्ड कॉल येतात. इतर नेटवर्कवरुन जिओ वर रोज 25 ते 30 कोटी मिस्ड कॉल येतात तर यामुळे जिओला 65 ते 75 कोटी मिनिट इनकमिंग ट्रॅफिक मिळायला हवे होते.

10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचा प्लॅन
इतर कंपन्यांच्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी जिओ 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत टॉप अप व्हाऊचर देखील जारी करण्यात आले. 10 रुपयांच्या प्लॅनमध्ये दुसऱ्या नंबरवर 124 मिनिट कॉलिंग उपलब्ध आहे. तर 20 रुपयांच्या प्लॅनमध्ये 249 मिनिट, 50 रुपयांच्या प्लॅनमध्ये 656 मिनिट आणि 100 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1,362 मिनिट कॉलिंग आहे.

टॉप व्हाऊचर च्या बदल्यात ग्राहकांना मिळतोे फ्री डेटा
जिओ आपल्या ग्राहकांना या टॉप व्हाऊचरवर फ्री डाटा देतो. 10 रुपयात 1 जीबी डाटा, 20 रुपयात 2 जीबी डाटा, 50 रुपयांत 5 जीबी, 100 रुपयांत 10 जीबी डाटा देण्यात येतो.

Visit : Policenama.com 

 

You might also like