Jio Vs BSNL | 90 दिवसांची व्हॅलिडिटी आणि Jio पेक्षा 2.4 पट डेटा, कमालीचा आहे हा BSNL प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि बीएसएनएल (BSNL) दोन्ही कंपन्या आपल्या ग्राहकांना 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन ऑफर करतात. जिथे बीएसएनएलचा हा प्लॅन अगोदरपासून आहे, तर रिलायन्स जिओने 90 दिवसांचा प्लॅन नुकताच लाँच केला आहे. बीएसएनएलच्या प्लॅनची किंमत 499 रुपये आणि रिलायन्स जिओच्या प्लॅनची किंमत 597 रुपये आहे. आज आपण या दोन्ही प्लॅनची तुलना करणार आहोत. Jio Vs BSNL | reliance jio 597 plan vs bsnl 499 plan which 90 days recharge is better

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jio चा 90 दिवसांचा प्रीपेड प्लॅन
रिलायन्स जिओच्या 90 दिवसांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 597 रुपये आहे. हा कंपनीचा नुकताच लाँच झालेल्या No Daily Limit प्लॅनपैकी एक आहे. यामध्ये ग्राहकांना 75 जीबी डेटा दिला जातो, ज्याचा वापर कोणत्याही डेली लिमिटशिवाय केला जाऊ शकतो. प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि जिजो appsचे मोफत सबस्क्रीप्शन दिले जाते.

BSNL चा 90 दिवसाचा प्रीपेड प्लॅन
बीएसएनएलच्या 90 दिवसांच्या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा दिला जातो. याप्रमाणे एकुण डेटा 180 जीबी मिळतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस दिले जाते. याशिवाय, BSNL Tunes आणि Zing सारखी सर्व्हिस मोफत दिली जाते.

कोणत्या प्लॅनमध्ये फायदा
बीएसएनएलचा प्लॅन 100 रुपयांनी कमी असूनही जिओच्या बरोबरीने व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत येतो. बीएसएनएल प्लॅन 180 जीबी डेटा, तर जिओचा प्लॅन केवळ 75 जीबी डेटा ऑफर करतो. बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये 100 रुपयांनी कमी असूनही जिओच्या तुलनेत 2.4 पट जास्त डेटा आणि 90 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत असल्याचे जिओपेक्षा जास्त चांगला आहे.

Web Titel :- Jio Vs BSNL | reliance jio 597 plan vs bsnl 499 plan which 90 days recharge is better

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते