JioFiber Recharge Plan | Jio ची जबरदस्त ऑफर, फ्री कॉलिंगसह मिळेल अनलिमिटेड डेटा, सोबत चालवू शकता TV सुद्धा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – JioFiber Recharge Plan | जिओ प्रीपेड आणि पोस्टपेड तसेच फायबर सेवा देते. प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलिओप्रमाणे, जिओ फायबर (Jio Fiber) मध्येही अनेक रिचार्ज पर्याय मिळतात. ब्रँड यूजर्स मंथली प्लान ऑफर करतो. त्याचा बेसिक प्लान 30एमबीपीएस स्पीडसह येतो. यामध्ये यूजर्सना 6 महिने आणि 12 महिन्यांच्या बिलिंग सायकलचा पर्याय मिळतो. Jio Fiber च्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये तुम्हाला काय-काय मिळेल ते जाणून घेवूया. (JioFiber Recharge Plan)

 

हा आहे बेस प्लान
जिओ फायबरचा सर्वात स्वस्त प्लॅन 399 रुपयांचा आहे. त्यात जीएसटीचा समावेश नाही. या प्लानमध्ये यूजर्सना अनलिमिटेड डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळेल. प्लान एका महिन्याच्या बिलिंग सायकलसह येतो. यामध्ये यूजर्सना 30Mbps अपलोड आणि 30Mbps डाऊनलोड स्पीड मिळेल. हा कंपनीचा बेस प्लान आहे.

499 रुपयांचा Jio Fiber प्लान
आम्ही जिओ फायबरच्या 499 रुपयांच्या प्लानवर तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला 30Mbpsच्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळतो. या प्लानमध्ये फ्री व्हॉईस कॉलिंगची सुविधा आहे. यूजर्सना 400 हून अधिक टीव्ही चॅनेलचा अ‍ॅक्सेस मिळतो. (JioFiber Recharge Plan)

 

यासोबतच कंपनी अनेक प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शनही देते. जिओ फायबर प्लॅनसह, यूजर्सना Universal +, ALT Balaji, Eros Now, Lionsgate Play, Jio Cinema, Shemaroo Me आणि जिओ सावन यांचे विनामूल्य सबस्क्रीप्शन मिळते. म्हणजेच, यूजर्सना 100 रुपये अधिक देऊन 6 OTT प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्सेस मिळतो.

 

599 रुपयात काय-काय मिळेल?
30Mbps स्पीडसह तिसरा प्लान 599 रुपयांचा आहे. यामध्ये यूजर्सना 200 रुपये अधिक भरून 14 OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळतो. यूजर्सना मागणीनुसार 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल मिळतात. प्लॅनमध्ये, यूजर्सना Disney + Hotstar, Sony Liv, ZEE5 सह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मिळते.

 

Web Title :- JioFiber Recharge Plan | jio fiber recharge plan offers unlimited data free calling and ott

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP MLA Ashish Shelar | CM एकनाथ शिंदेंनी सांभाळलेल्या नगरविकास खात्याविरोधात आशिष शेलार यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका; जाणून घ्या प्रकरण

 

Maharashtra Rains | खुशखबर ! राज्यात पाऊस सक्रिय ! 7 जुलैपासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता – IMD

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम