Jitendra Awhad | “इतिहासाचे विकृतीकरण नको…”; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन – सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर (Pratapgad) अफजल खानच्या (Afzal Khan) कबरी जवळचे अनधिकृत बांधकाम शासनाने काल पडले (Demolition). या कारवाईवर समाजाच्या सर्व स्थरांवरून प्रतिक्रिया येत आहेत. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. इतिहास बघताना इतिहासाच्या नजरेने बघणे गरजेचे आहे, असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, ‘इतिहास बघताना त्या नजरेने बघा, अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात.’

प्रतापगड येथे असलेल्या अफझल खानच्या कबरी जवळचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश कोर्टाने २००७ साली दिले होते. पण ती कारवाई खोळंबली होती, शेवटी काल मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अनधिकृत बांधकाम पडले गेले. तत्पूर्वी या भागात कलम १४४ लागू करून जमावबंदी केली होती.

Web Title :-  Jitendra Awhad | “Don’t distort history…”; Reaction of NCP leader Jitendra Awad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ambadas Danve | संजय राऊत पुन्हा नव्याने महाराष्ट्रात मोठा लढा उभा करतील – अंबादास दानवे

Tollywood News | पुन्हा एकदा ‘हि’ जोडी येणार एकत्र; चाहत्यांना दिली गुड न्यूज

Vijay Wadettiwar | महाराष्ट्रात शिवाजी महाराजांची तलवार आणल्याने रोजगार येणार आहेत का? – विजय वडेट्टीवार

Urfi Javed | FIR दाखल झाल्यानंतर उर्फीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली मी भारतात राहते…

Sushma Andhare | ‘आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे…’, सुषमा अंधारेंचा किरीट सोमय्यांना खोचक टोला