Jitendra Awhad | एकनाथ शिंदेंसोबतच्या मैत्रिवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, ”ते मुख्यमंत्री झाल्याने मला आनंदच झाला कारण…”

मुंबई : Jitendra Awhad | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झाल्याने मला आनंदच झाला. कारण तोपर्यंत माझे आणि त्यांचे संबंध चांगले होते. १९९७-९८ पासून माझे एकनाथ शिंदेंशी मैत्रीपूर्ण संबंध होते. आमची मैत्री उघडपणाने नव्हती. आम्ही पैशांच्या देवाणघेवाणीत नव्हतो. पण कधी एकमेकांना काही मदत लागली तर आम्ही जरुर मदत करायचो, अशी माहिती राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली. सध्या दोघांची मैत्री कशी आहे, हे देखील यावेळी आव्हाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात जुनी मैत्री आहे. दोघांचे पक्ष वेगळे असले तरी त्यांची मैत्री कायम होती. परंतु, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मैत्रीत काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. यावरून विचारलेल्या प्रश्नाला आव्हाड यांनी वरील उत्तर दिले.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मी म्हटले होते, चला, आता हक्काचा माणूस आला. त्यांच्या दारात जाऊन निधी मागू शकतो.

तेव्हा माझ्या पक्षातील काही लोकांनी मला म्हटले की, तू त्यांच्या दारात जाऊन निधी मागू, असे का म्हणालास? पण त्यात काय झाले. मतदारसंघासाठी कुणाच्या दारात जावं लागलं, तर हरकत आहे. आता हे (अजित पवार गट – Ajit Pawar Group) विकासासाठी मोदींच्या दारात गेलेच ना…त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदेंच्या दारात गेलो, तर काय फरक पडतो.
शेवटी मतदारसंघाच्या विकासासाठीच तर आपण आमदार असतो, असे आव्हाड म्हणाले.

सध्या एकनाथ शिंदे यांच्या सोबत कसे संबंध आहेत? याबाबत आव्हाड म्हणाले, आता माझी आणि त्यांची कधी भेटही नाही.
चर्चाही नाही. फोनही नाही. मला आता त्यांच्याकडे काही कामही पडत नाही.

त्यांच्याकडून निधी मिळणार नाही, ते आपल्याला सगळीकडून दाबण्याचा प्रयत्न करणार,
आपल्याला मतदारसंघात काम करू देणार नाहीत, हे सगळे आपल्याला माहीत आहे.
त्यामुळे उगीच त्यांच्या दारात जाऊन उभे कशाला राहायचे? अशी भावना आव्हाड यांनी व्यक्त केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vinayak Raut On Nilesh Rane | विनायक राऊतांचे निलेश राणेंना खुले आव्हान,
”निवृत्ती न घेता लोकसभेला उभे राहा, मग…”