Jitendra Awhad | ‘शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, कारण…’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेची (Rajya Sabha Election) धुमधाम संपल्यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीकडे (Presidential Election) सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती पदाच्या नावासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. खुद्द शरद पवार यांनी याविषयी कोणतेही विधान केले नसले तरी काँग्रेसचे नेते नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वेगळंच गणीत मांडलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रपती होऊ नये, असं म्हणत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.

 

म्हणून पवारांनी राष्ट्रपती होऊ नये
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत संख्याबळ पाहून निर्णय घेण्यात यायला हवा.
शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व स्वत:ला राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत.
जे राजकारणी मुख्य प्रवाहात असतात, त्यांनी मुख्य प्रवाहातच रहावं. ज्या पद्धतीने शरद पवार आजही ग्राणीण भागात फिरतात, लोकांशी संवाद साधतात ते पाहता त्यांनी याचपद्धतीचे काम कायम करावे, असे मला वाटते. ते राष्ट्रपती झाले तर महाराष्ट्राचा (Maharashtra) सन्मान होईल हे खरं आहे. पण शरद पवार जोपर्यंत लोकांच्यात मिसळत नाहीत तोवर त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद दिसत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच रहावे, तोच त्यांचा खरा हक्क असल्याचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

यूपीएचे प्रमुख करावं
विरोधी पक्षातील सक्षम चेहरा म्हणून शरद पवारांचे नाव घेतलं जात आहे.
मात्र विरोधी पक्षांना खरंच तसं वाटत असेल तर पवार यांना राष्ट्रपती करण्यापेक्षा यूपीएचे (UPA) प्रमुख नेते म्हणून जाहीर करावं आणि 2024 ची रणनिती आखण्यास सुरुवात करावी.
शरद पवार यांना पंतप्रधान (PM) करा असं मी आता म्हणत नाही.
पण जर आतापासूनच गणितांची जुळवाजुळव केली तर 2024 च्या निवडणुकांचे गणित अवघड जाणार नसल्याचे आव्हाडांनी सांगितले.

 

Web Title :- Jitendra Awhad | NCP chief sharad pawar should not contest for president of india post here is why ncp minister jitendra awhad reveals the real reason

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा