Jitendra Awhad On Ajit Pawar Group | पवारांनी पक्ष हुकुमशाहीने चालवला, अजित पवार गटाच्या आरोपाने जितेंद्र आव्हाड भावूक, पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाले…

मुंबई : Jitendra Awhad On Ajit Pawar Group | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, यावर निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष हुकुमशाहीने चालवला, असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी करत, पवारांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी खुद्द शरद पवार आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. यासंदर्भातील माहिती देण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सुनावणीतील वरील प्रसंग सांगताना त्यांचे डोळे पानावले होते. (Jitendra Awhad On Ajit Pawar Group)

भावूक झालेले जितेंद्र आव्हाड म्हणाले, त्यांच्या वकिलांचे बोलणे ऐकून कशाला लढतोय असे वाटले. हे घरात बसल्यानंतर त्यांना फोन येणार तुम्हाला मंत्री बनवले आहे, शपथविधीला या. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याला काय फळ मिळाले तर ते हुकुमशाह आहेत? (Jitendra Awhad On Ajit Pawar Group)

आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने सांगावे, शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात. आणि त्यांनी पक्षात लोकशाही जिवंत ठेवली नाही. एवढेच होते तर तुम्ही सांगून जायचे होते, तुम्ही लोकशाहीवादी नाही, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचे नाही. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो.

आव्हाड म्हणाले, त्यांच्या हातातील बाळ आता मोठे झाले आहे, वाढण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा वृक्ष झालाय,
ते आता तुम्ही त्यांच्या हातातून उपटून घेण्याचा प्रयत्न करताय.

आव्हाड म्हणाले, राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते.
ज्यांनी त्यांच्याकडून सगळे घेतले, ते इतके असंवेदनशील झालेत. हे पहिल्या सुनावणीत घडले आहे. अजून खूप आहे.
तुमच्या मनाला त्याचे उत्तर द्यावे लागेल.

शरद पवारांसमोर त्यांच्या वकिलांनी हे आरोप केले. काय घडेल काय नाही ही लढाई निवडणूक आयोगासमोर होत आहे.
अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. पण प्रश्न संवेदनशीलतेचा आहे.
ज्यांनी तुम्हाला वाढवले, प्रत्येक प्रसंगात तुमच्यामागे पहाडासारखा उभा राहिला.
केवळ राजकीय लढाई जिंकण्यासाठी तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले, ते कुणालाही सहन होणार नाहीत, असे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, शरद पवारांनी आयुष्यात कधीही लोकशाही मुल्याबाहेर काम केले नाही. राजकारण
सोडून मदत करणारे आहेत. कुटुंबातील भांडणांनाही वेळ देणारे शरद पवार आहेत. कधी कुणाबद्दल वैयक्तिक द्वेष नाही.
आज त्या माणसाला समोर बसवून आरोप करत आहेत.

सर्वसामान्य माणसाला ताकद मिळावी म्हणून आयुष्य खर्ची घातले. वयाच्या ८४ व्या वर्षी पवारांचे हृदय
महाराष्ट्रासाठी धडधडत आहे. त्यांच्याबद्दल कालचे उद्धार अनाकलनीय होते. कमीत कमी यापुढे तुमचा वकील हे
बोलणार नाही याची काळजी घ्या, अशी विनंती आव्हाड यांनी अजित पवार गटाला केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश