Jitendra Awhad On Amol Mitkari | जितेंद्र आव्हाडांचे मिटकरींना प्रत्युत्तर, ”अजित पवारांनी ५० हजार रूपये पगारावर ठेवलेल्या माणसानं उंचीपेक्षा…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री राम मांसाहारी होते हे सिद्ध करावे, असे आव्हान अजित पवार गटातील (Ajit Pawar Group) आमदार अमोल मिटकरी यांनी दिले होते. आता आव्हाड यांनी अमोल मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अजूनही भाजपा (BJP) आणि मित्रपक्ष आक्रमक झालेले दिसत आहेत. काही ठिकाणी आव्हाड यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले आहेत. आता अजित पवार गटाने आव्हाडांवर ( Jitendra Awhad On Amol Mitkari) आरोप सुरू केले आहेत.

अमोल मिटकरी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, संविधानाचा डंका पिटणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरलेत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला श्रद्दा व उपासनेचे अधिकार दिलेत.
प्रभु श्री रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून शिबिर चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याने श्रीराम मांसाहारी होते हे सिद्ध करावे.

मिटकरी यांच्या या पोस्टनंतर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, अमोल मिटकरींनी केलेली वादग्रस्त विधाने बाहेर काढली तर,
त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल. महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्यावर व्याख्याने देण्यासाठी मिटकरी ८ ते १० हजार रूपये घ्यायचे. अजित पवारांनी ५० हजार रूपये पगारावर
ठेवलेल्या माणसाने उंचीपेक्षा जास्त बोलू नये.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radha Krishna Vikhe Patil | तलाठी भरती : मंत्री राधाकृष्ण विखे यांचा विरोधकांना थेट इशारा, सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करू!

अल्पवयीन मुलींकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी एकाला अटक, येरवडा परिसरातील घटना

Pune News | कात्रज डेअरीच्या जागेवरील मैदानाचे आरक्षण!, ‘राजकिय व प्रशासकिय’ व्यवस्थेने घातलेल्या घोळात दुध संघ व स्थानीक नागरिक वेठीस!

Fursungi Devachi Uruli Garbage Depot | फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवर ‘बॉलिवूड’चे शुटिंग; अक्षय कुमार, सारा अली खानच्या ‘स्कायफोर्स’च्या शूटिंगसाठी मागणी

दीडशे रुपये मोबदला देऊन तरुणाचे साडे तेरा लाख हडपले, हडपसर मधील प्रकार

वाईन शॉपमधून विदेशी दारूसह रोकड लंपास, दापोडी मधील घटना