Jitendra Awhad On Mulund Incident | मुलुंडमधील घटनेवर जितेंद्र आव्हाडांची वेगळीच प्रतिक्रिया, मराठी लोकांना दाखवला आरसा

मुंबई : Jitendra Awhad On Mulund Incident | मुलुंड येथील शिवसदन सोसायटीत घर घेण्यासाठी गेलेली मराठी महिला तृप्ती देवरूखकर यांना तेथील गुजराती लोकांनी मराठी असल्याने घर नाकारले. शिवाय, त्या महिलेशी अरेरावी केली. ही घटना सदर महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्याने त्याचे संतप्त पडसाद उमटू लागले. या घटनेची दखल घेत मनसेने सोसायटीचा सेक्रेटरी, चेअरमन यांना मनसे स्टाईल जाब विचारला आणि माफी मागण्यास भाग पाडले. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत मराठी लोकांनाच आरसा दाखवला आहे. (Jitendra Awhad On Mulund Incident )

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, मराठी महिलेला घर नाकारले म्हणून गुजराती लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मारवाडी, जैन, गुजराती हाउसिंग सोसायटीमध्ये मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून घरे मिळत नाहीत. (Jitendra Awhad On Mulund Incident )

मुंबईत हे सगळ्यांना माहितीच आहे. मुलुंडमधील घटनेनंतर गुजराती लोकांना हाकलून लावा, अशा कमेंटचा पाऊस पडला. हेच मराठी लोक जात पाहून शेडुल्ड कास्ट लोकांना घरे नाकारतात. धर्म पाहून मुसलमानांना घर नाकारतात. शेरास सव्वाशेर… गुजराती, मारवाडी, जैन जेव्हा मराठी लोकांना लाथ घालतो, तेव्हा हे किंचाळतात. कटू पण सत्य आहे.

दरम्यान, या घटनेवर खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की, हा एवढा माज कुठून आला? मुलुंडमध्ये मराठी माणसाला जागा नाकारण्यापुरता हा विषय नाही. आणखी बरेच काही आहे. हा माज कोठून आला. याचे उत्तर एकनाथ शिंदे व त्यांच्या मिंदे महा मंडळाने द्यायला हवे.

राऊत म्हणाले, भाजपाने शिवसेना फोडली ती या मंडळींचा माज वाढवण्यासाठी.
मराठी माणूस मिंधा करण्याचा हा डाव उधळला जाईल. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी ते उघडे पडले.
तृप्ती देवरुखकर यांचे अश्रू वाया जाणार नाहीत. जय महाराष्ट्र.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
त्यांनी म्हटले की, कुणाची अशी मक्तेदारी चालू देणार नाही. असा प्रकार महाराष्ट्रात सहन केला जाणार नाही.
जर यात तथ्य असेल तर गंभीरतेने नोंद घेऊ. मराठी माणसाचा असा अपमान करण्याचे धाडस होणार नाही अशी भूमिका घेऊ.
महाराजांच्या भूमीत हे घडत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. नेमके तिथे काय झाले याची माहिती घेतली जाईल
आणि योग्य ती कारवाई केली जाईल. दरम्यान, राज्य महिला आयोगाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | छगन भुजबळ शरद पवारांना जेलमधून ब्लॅकमेल करायचे, माजी आमदार रमेश कदमांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Accident News | पुणे-सातारा महामार्गावर गॅस टँकर उलटला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली