Jitendra Awhad । म्हाडाची घरे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांना देण्याचा वाद, मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसापूर्वी मुंबईमधील टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील (Tata Cancer Hospital in Mumbai) रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णावर उपचार होईपर्यंत मुंबईत राहण्याची सोय व्हावी म्हणून राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी म्हाडाच्या 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, याला शिवसेनेच्या काही स्थानिक आमदारांनी विरोध केल्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्याला स्थगिती देण्यात आली. यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) नाराज झाले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

‘मागील महिन्यात टाटा रुग्णांना, नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav
Thackeray) यांच्या मान्यतेने 100 सदनिका देण्याची मान्यता देण्यात आली होती. या निर्णयाला
काल टाटा कॅन्सर रुग्णांना म्हाडा घरांना स्थगिती देण्यात आली होती. स्थानिक आमदारांनी याला
नकार दिल्यानंतर या घरांना स्थगिती देण्यात आली. यानंतर आता बॉम्बे डाईनमध्ये 100 सदनिका
देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी
दिली. यावेळी आव्हाड हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्री मंडळाच्या बैठकी आधी मला बोलावून जागा त्याच परिसरात जागा शोधण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर आता बॉम्बे डाईनमध्ये 100 सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाची सदनिका कोणाला, कोणाच्या हातातून द्यायची आहेत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना विचारूनच निर्णय घेतला होता.

Terrorist Hafiz Saeed | दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, 20 जण जखमी, पाकिस्तानात प्रचंड खळबळ

Devendra Fadnavis । ‘ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, निवडणुका रद्द केल्या नाहीत तर… – फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Jitendra Awhad | shiv sena ncp dispute settled after cm uddhav thackeray decision mhada flat tata patients mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update