Terrorist Hafiz Saeed | दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू, 20 जण जखमी, पाकिस्तानात प्रचंड खळबळ

इस्लामाबाद : वृत्तसंस्था (policenama online) – मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यातला (Terrorist attack) मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) लाहोर येथील घराबाहेर भीषण स्फोट (Explosion) झाला आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक आणि पोलीस दाखल झाले असून जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पण हाफीज सईदच्या (Terrorist Hafiz Saeed) घराजवळ हा स्फोट झाल्याने यामागे मोठं षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पाकिस्तानात (Pakistan) एकच खळबळ उडाली आहे. स्फोट झाला त्यावेळी हाफीज सईद घरीच होता का, याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भयंकर होता की, परिसरातील इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. तर एक इमारत पूर्णपणे कोसळली आहे. प्राप्त माहितीनुसार, जौहर टाउनच्या अकबर चौकातील एका राहत्या घरात हा स्फोट झाला आहे. एका वृत्तानुसार हाफीज सईद ज्या परिसरात राहत होता, तिथून जवळच हा स्फोट झाला आहे.  या घरात संशायस्पद स्थितीत अनेकांची ये-जा होती. पाकिस्तानी चॅनल ARY न्यूजच्या माहितीनुसार, स्फोटोत चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना ICU मध्ये दाखल केले आहे. तर 2-3 लोक किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस (Police) दाखल झाले असून पंचनामा करत आहेत.

Web Title :- Terrorist Hafiz Saeed | massive blast near hafiz saeeds house at lahor pakistan 2 killed

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

रश्मी शुक्ला यांच्यासह एका पोलिस अधीक्षकांवर गंभीर आरोप; पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

महाराष्ट्र मेट्रोच्या नागपूर ब्रांचमध्ये विविध जागांसाठी पदभरती, जाणून घ्या

विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर