भारतीय महिलांना उलट्या पदराची साडी नेसण्यास कोणी शिकवले ?, PM मोदींनी सांगितली एक रंजक कहाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विश्व भारती विद्यापीठाच्या शताब्दी कार्यक्रमात भाग घेतला. या दरम्यान त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमास संबोधित केले आणि सांगितले की, विश्व भारती गुरुदेव यांचेे चिंतन, दर्शन आणि परिश्ररमांचे मूर्त रूप आहे. आपल्या भाषणात पीएम मोदी यांनी महिलांच्या उलट्या पदराच्या साड्या घालण्याच्या सुरुवातीची मजेदार गोष्ट सांगितली.

कसा सुरू झाला उजव्या बाजूच्या पदराचा ट्रेंड
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे थोरले बंधू आणि देशातील पहिले आयसीएस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानंदिनी देवी यांनी उजव्या खांद्यावर साडीचा उलटा पदर कसा बांधायचा हे महिलांना शिकवले.

डाव्या खांद्यावर पदर असल्याने होत होती मोठी समस्या
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘गुरुदेव रवींद्रनाथ यांचे थोरले बंधू सत्येंद्र नाथ यांची गुजरातच्या अहमदाबादमध्ये आयसीएस अधिकारी म्हणून नेमणूक झाली. सत्येंद्रनाथ यांची पत्नी ज्ञानंदिनी अहमदाबादमध्ये राहत होती. स्थानिक महिला डाव्या खांद्यावर पदर ठेवत असत ज्यामुळे महिलांना काम करणे कठीण झाले. त्यावेळी ज्ञानंदिनी देवींना सूूचले की, उजव्या खांद्यावर पदर का घेऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आता मला नक्की माहित नाही पण उजव्या खांद्यावर साडीचा पदर त्यांचीच देणगी (ज्ञानानंदिनी देवी) आहे. महिला सक्षमीकरणाशी संबंधित संस्थांनी या वस्तुस्थितीचा अभ्यास केला पाहिजे.

पंतप्रधानांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या गुजरात संबंधांचा केला उल्लेख
यावेळी पंतप्रधान मोदींनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि गुजरात यांच्यातील सखोल संबंधांचा देखील उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा मी गुरुदेव बद्दल बोलतो तेव्हा मी गुरुदेव आणि गुजरातची जवळीक लक्षात ठेवण्याचा मोह थांबवू शकत नाही. हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे कारण ते आम्हाला एक भारत श्रेष्ट भारत या भावनेने भरुन टाकते. आपला देश वेगवेगळ्या बोलीभाषा आणि खानपानसह किती जोडलेला आहे? आपला देश विविधतेसह एक आहे. एकमेकांकडून बरेच काही शिकत आहोत.