JNU Attack : हल्ल्याबाबत लष्करप्रमुखांना विचारण्यात आला प्रश्न, दिले ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या JNU मधील वातावरण आटोक्याच्या बाहेर गेलेले आहे. अनेक मुद्द्यांवर येथे विद्यार्थी आंदोलनं करत आहेत. JNU मध्ये काही दिवसांपूर्वी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह १८ जणांना गंभीर मारहाण करण्यात आली होती. यामुळे याचे पडसाद देशभरात उसळले होते. आणि देशातील विविध कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध नोंदवले होते. विशेष म्हणजे दिल्ली पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांऐवजी मारहाणीत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवरच गुन्हे दाखल केले होते. आज देशाचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जेएनयू बाबत भाष्य केले.

माजी लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी जेएनयूवर केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यासंदर्भात पत्रकार परिषदेत नरवणे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच ज्या विद्यापीठाच्या नावाने राष्ट्रीय सुरक्षा अकादमी एनडीएची पदवी देते त्याच विद्यापीठामध्ये असे वाद सुरू आहेत. तेथील विद्यार्थ्यांवर मास्क धारण केल्लेल्या हल्लेखोरांनी मारहाण केली होती. त्यामुळे या गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत आणि एवढे सगळे घडत असताना तुम्हाला काय वाटते ? असा प्रश्न एका वृत्तपत्राच्या पत्रकाराने मनोज मुकुंद नरवणे यांना विचारला होता.

या प्रश्नावर नरवणे यांनी उत्तर दिले की, एनडीए ही देशाची सर्वोत्तम संस्था आहे. मी देखील त्याच संस्थेमधून आलोय ज्या एनडीएमधून सध्याचे हवाईदल प्रमुख आणि नौसेना प्रमुख आले आहेत. एनडीएच्या कार्यप्रणालीची अनेक उदाहरणे दिली जातात. असे असले तरी नरवणे यांनी जेएनयू हल्ल्याबाबत आणि जेएनयू वादाबाबत बोलणे टाळले आहे. कारण बिपीन रावत यावर बोलले होते तेव्हा त्यांनी स्वतःच्या अंगावर वाद ओढवून घेतला होता. रावत यांच्यावर त्या दरम्यान सैन्यदलातून खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्यावेळेस अधिकाऱ्यांनी असे मत व्यक्त केले होते की, एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याकडून असे वक्तव्य होणं हे चुकीचं आहे.

नरवणे म्हणाले की, जम्मू काश्मीरचा संपूर्ण भाग हा भारताचाच अविभाज्य घटक आहे, हा संसदीय संकल्प देखील आपण केला आहे. त्यामुळे पीओके भारतात आला पाहिजे ही संसदेची इच्छा असेल तर आम्ही त्याबाबत योग्य ती पाऊले आदेश मिळाल्यानंतर उचलू आणि योग्य ती कारवाई देखील करू असे त्यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/