SSB Constable Recruitment 2020 : सशस्त्र सीमा दलात 1541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती, तात्काळ करा अर्ज, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) कॉन्स्टेबलच्या 1541 पदांवर भरतीसाठी नुकतीच जाहिरात दिली होती. या पदांसाठी अर्ज करण्याचा कालावधी लवकरच संपत आहे. ज्या उमेवारांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही, त्यांनी एसएसबीचे रिक्रूटमेंट पोर्टल, ssbrectt.gov.in वर जाऊन अखेरची तारीख 27 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा.

उमेवार खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे सुद्धा भरतीची नोटीस डाऊनलोड करू शकतात आणि ऑनलाइन अर्ज करू शकतात. सशस्त्र सीमा दलाद्वारे भरतीच्या सूचनेनुसार (No.338/RC/SSB/Combined Advertisement/CTs/2020) विविध ट्रेड्स, जसे की – ड्रायव्हर, कारपेंटर, प्लंबर, वॉशरमन, बार्बर व अन्यमध्ये कॉन्स्टेबल रँकवर ट्रेड्समन पदांसाठी भरती केली जाणार आहे. एसएसबीद्वारे कॉन्सटेबल ट्रेड्समनची भरती अस्थायी आधारावर केली जाईल, परंतु ती नंतर स्थायी केली जाईल.

कोण करू शकतात अर्ज
सशस्त्र सीमा दलात (एसएसबी) कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण केली आहे आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. तसेच, ड्रायव्हर पदासाठी 10वीसह वैध व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा प्राप्त असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष आणि कमाल 23/25/27 वर्ष (पदांनुसार वेगवेगळे) असायला हवे.

ऑनलाइन अर्ज करताना उमेवाराला 100 रुपये अर्ज शुल्क सुद्धा जमा करावे लागणार आहे, हे पैसे ऑनलाइन माध्यमातून (डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग) भरता येतील. एससी, एसटी, एक्स-सर्व्हिसमन आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.