‘या’ खेळाडूचे नशीब पालटले, विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात क्रिकेटला धर्म समजले जाते. त्यामुळे जगभरात भारतीय खेळाडूंना सर्वात जास्त मानधन देखील मिळत असते. भारतीय खेळाडूंमध्ये कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांना सर्वाधिक मानधन मिळते. मात्र आता इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना याबाबतीत मागे टाकले असून इंग्लंडच्या एका युवा खेळाडूने याबाबतीत विराट कोहलीला मागे टाकले.

नुकतेच पदार्पण केलेल्या जोफ्रा आर्चरला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठे गिफ्ट दिले आहे. क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चर याला टी-20 आणि कसोटी सामन्यांमधील  कॉन्ट्रॅक्ट दिले असून यामुळे तो काही विशिष्ट खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. नुकत्याच झालेल्या अशेस मालिकेत 20.27च्या सरासरीनं 22 बळी घेतले होते. त्यामुळे त्याला इंग्लड क्रिकेट बोर्डाने हे गिफ्ट दिले आहे.

इंग्लंडच्या या खेळाडूंना मिळतो सर्वात जास्त पगार

 

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना तीन श्रेणींमध्ये विभागले आहे. त्यानुसार सर्वात वरच्या श्रेणीतील खेळाडूला 7 कोटी रुपये पगार मिळतो. मात्र आता इंग्लंडच्या याच श्रेणीतील खेळाडूंना 9 कोटी रुपये पगार म्हणून मिळणार आहे. कसोटी आणि टी-20 असे दोन्ही प्रकार खेळणाऱ्या नऊ खेळाडूंना वर्षाला 9 कोटी रुपये मिळणार आहेत. यामध्ये क्रिस वोक्स, जॉस बटलर, जो रूट, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स याना वर्षाला 9 कोटी रुपये मिळणार आहेत.

इंग्लंडच्या या कराराचा अर्थ काय

इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून कसोटी करार मिळालेल्या खेळाडूंना वर्षाला 6 लाख पाऊंड म्हणजे 53 कोटी रूपये मिळतात.तर एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंना  2.75 लाख पाऊंड म्हणजे 25 कोटी रूपये  मिळतात.

visit : Policenama.com