‘पागलपंती’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जॉन अब्राहम झाला जखमी

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ‘पागलपंती’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जॉन जखमी झाला. सुत्रांनी माहिती दिल्यानुसार, जॉनच्या खांद्याला लागले आहे. डॉक्टरने त्याला २ आठवडे आराम करण्यास सांगितले आहे. १४ ते १५ दिवस जॉन अब्राहम काम करु शकत नाही, असे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.

महबूब स्टुडिओमध्ये शुटिंगच्या दरम्यान जॉन जखमी झाला आहे. असे समजले आहे की, हा चित्रपटाचा शेवटचा सीन होता. त्याचवेळी तो जखमी झाला. जॉन जोपर्यंत ठिक होत नाही तोपर्यंत काम करु शकत नाही. जेव्हा जॉन ठिक होईल तेव्हा पुन्हा शुटिंगला सुरुवात होईल, असे ‘पागलपंती’ चित्रपटाचे निर्देशक कुमार मंगतने सांगितले आहे.

कुमार मंगत यांनी सांगितले की, ज्या सीनसाठी शुट चालू होते. त्या सीनमध्ये प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आणि अरशद वारसीही सोबत होते. हा चित्रपट २२ नोहेंबर २०१९ ला प्रदर्शित होणार आहे.