पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जॉन अब्राहमचे आवाहन 

सध्या केरळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय आपात्कालीन बचाव दलाच्या आणखी १२ टीमही येथे रवाना करण्यात आल्या असून दरम्यान पावसाच्या थैमानामुळे केरळमध्ये आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अभिनेता जॉन अब्राहम यानेही येथील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

[amazon_link asins=’B00G9TFSAS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f0d2cff2-a29e-11e8-99ef-7b17a17c69a0′]

राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. केरळच्या जनतेच्या पाठिशी केंद्र सरकार ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. जॉननेही त्यानंतर लोकांना आवाहन करुन मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या जे काही केरळमध्ये सुरु आहे त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील नागरिकांवर ओढावलेले हे संकट पाहून मला प्रचंड त्रास होत आहे. माझ्या बालपणीच्या आठवणी केरळबरोबर जोडल्या गेल्या असल्यामुळे साऱ्यांना माझी विनंती आहे की मुख्यमंत्री मदत निधीच्या त्यांनी माध्यमातून या पूरग्रस्त नागरिकांची मदत करावी, असे आवाहन जॉनने केले आहे.