Journalist Devendra Jain | पत्रकार देवेंद्र जैनला 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी; जाणून घ्या न्यायालयातील युक्तीवाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Journalist Devendra Jain | जमीन व्यवहारात फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आलेल्या आरोपी पत्रकार देवेंद्र जैन (Journalist Devendra Jain) याला विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर (Special Judge S. R. Navander) यांनी 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

पुणे गुन्हे शाखेने (Pune Crime Branch Police) मंगळवारी (ता. 13) अटक केल्यानंतर बुधवारी (ता. 14) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे (rti activist ravindra barate) याच्या टोळीने देवेंद्र जैन (Devendra Jain), बडतर्फ पोलिस शैलेश जगताप (dismissed police shailesh jagtap) (व इतरांच्या मदतीने अनेकांची जमीन व्यवहारात फसवणूक केली आहे. तसेच धमकी देवून त्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. धमकावून खंडणी वसुल करणे, फसवणूक केली आणि जातिवाचक भाष्य केले म्हणून आरोपींवर हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar police station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

गुन्हा दाखल झाल्यापासून जैन हा फरार होता. फरार कालावधीत तो कोठे होता?, त्याला कोणी आसरा दिला? याचा तपास करायचा आहे. तसेच यापूर्वी अटक केलेल्या आरोपींशी संगनमत करून त्याने हा गुन्हा केला असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केली. बचाव पक्षाचे वकील राजा देशमुख (advocate raja deshmukh) यांनी युक्तिवाद केला की, गुन्हा घडला त्यावेळी जैन घटनास्थळी नव्हता. हे न्यायालयात सादर केलेल्या गुगल मॅपवरील त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याने उच्च न्यायालयात (High Court) मोक्काच्या गुन्ह्यातून वगळण्यासाठी देखील अर्ज केला आहे. त्याला या गुन्ह्यात गोवले गेले आहे.

Web Titel :- Journalist Devendra Jain | Journalist Devendra Jain remanded in police custody till July 20; Learn court arguments

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘बाय बाय डिप्रेशन, सॉरी गुड्डी’ ! FB पोस्ट टाकत पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाची आत्महत्या

Pune Crime | मुंबईला जाण्यासाठी बस स्टॉपवर झोपलेल्या प्रवाशाचा चोरीच्या उद्देशाने खून; पुणे स्टेशन परिसरातील घटना, प्रचंड खळबळ