दुर्देवी ! ऑक्सीजन न मिळाल्याने न्यायाधीश कमलनाथ जय सिंह पुरे यांचे निधन, जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केलं दुःख तर संपुर्ण जिल्हयावर शोककळा

रिवा : वृत्तसंस्था –   मध्य प्रदेशातील रिवाच्या जिल्हा न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत असलेले कमलनाथ जय सिंह पुरे यांचे गुरूवारी कोरोना संसर्गाने निधन झाले. ज्यानंतर संपूर्ण रिवा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर जिल्हाधिकारी इलैया राजा टी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. बुधवारी त्यांना संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तिथे ऑक्सीजन उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

कोरोना महामारी देशभरात वाढत आहे. देशात संसर्गाने होणार्‍या मृत्यूंचे आकडे सुद्धा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. गुरूवारी रिवा जिल्ह्यातील या न्यायाधीशांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

न्यायाधीशांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रशासकीय अधिकार्‍यांसह मुख्य न्यायाधीश अरूण सिंह हे संजय गांधी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रिवा जिल्हा न्यायालयात न्यायाधीश पदावर कार्यरत असताना कमलनाथ जय सिंह पुरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला. ज्यानंतर त्यांना रिवा येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ऑक्सीजन अभावी त्यांचा मृत्यू झाला.