जेलमध्ये कैद्याला मारहाण करुन विष्ठा खायला लावली : रमेश कदम यांचा गंभीर आरोप 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ठाण्यातील जेल प्रशासनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत. जेल प्रशासनाने एका कैद्याला जबर मारहाण करून त्याला मानवी विष्ठा खायला लावल्याचा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. या घटनेनंतर कैद्याची प्रकृती देखील बिघडल्याचा दावा देखील कदम यांनी केला आहे. आण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम अटकेत आहेत.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97367468-7f8b-11e8-8a05-5da5df8e2c67′]

रमेश कदम यांनी केलेल्या आरोपानुसार “ही घटना ठाणे येथिल जेल मध्ये २७ जून रोजी घडली. जेल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी एका कैद्याला जबर मारहाण तर केलीच शिवाय त्याला मानवी विष्ठा देखील खायला लावली .” रमेश कदम यांनी या संदर्भात मानवाधिकार आयोगाकडे तक्रार नोंदवली असून जेल प्रशासनाला समन्स पाठवला आहे. तसेच आरोपांना आधार म्हणून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी देखील करण्याची मागणी केली आहे.

या घटनेबाबत जेलर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.