अमोल कोल्हे यांच्याकडून कोविड टेस्टसाठी दिलं ‘हे’ उपकरण, एकाच वेळी करणार 24 चाचण्या

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन –  शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने अमोल कोल्हे व जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने अनावश्यक खर्च टाळून नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोव्हिड केअर सेंटरला “हाय फ्लो नोझल ऑक्सिजन” हे उपकरण भेट म्हणून देण्यात आले. हे उपकरण रुग्णांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे.

ऑक्‍सिजनची गरज लागणाऱ्या रुग्णांसाठी याचा खूप फायदा होणार आहे. या उपकरणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी २४ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉक्टर योगेश आगम, डॉक्टर मिलिंद घोरपडे ,डॉक्टर अभिजीत काळे, यांच्याकडे जगदंब प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सागर रामसिंग कोल्हे यांच्यातर्फे हे उपकरण सुपूर्द करण्यात आले.

यावेळी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नरचे तहसीलदार हनमंत कोळेकर, बाजार समितीचे माजी संचालक दिलीप कोल्हे, बंधन बँकचे मॅनेजर आदित्य मराठे, तुषार डोके, अतुल आहेर,गणेश वाजगे, अशिष हांडे आदी व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होते.