‘मला तोंड उघडायला लावू नका, 100 कोटींची वसुली…’; ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला टोला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदें यांनी आज संसदेमध्ये बोलताना काँग्रेसला महाराष्ट्रातील १०० कोटी वसुलीच्या प्रकरणावरुन टोला लगावला आहे. ज्योतिरादित्य शिंदे आर्थिक विधेयकासंदर्भात आपलं मत मांडत असतानाच काँग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी “मला तोंड उघडायला भाग पाडू नका,” असा इशारा काँग्रेस खासदारांना दिला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटींच्या वसुलीवरुन सुनावले.ज्योतिरादित्य शिंदें यांनी “मला तोंड उघडायला लावू नका. पब आणि रेस्तराँमधून १०० कोटींची वसुली केली जाते आणि तीसुद्धा थेट गृहमंत्र्यांकडून,”असे म्हणत त्यांनी काँग्रेसच्या खासदारांना सुनावले आहे.

ज्योतिरादित्य शिंदे राज्यसभेमध्ये आर्थिक विधेयकासंदर्भात आपलं मत मांडत होते. त्याचवेळी काँग्रेसच्या काही खासदारांनी पेट्रोल-डीझेलच्या किंमतींवरुन गोंधळ घालत त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका शहराचा दर १०० कोटी रुपये आहे असे म्हणत काँग्रेसला टोला लगावला आहे. त्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले इंधनाचे दर वाढले आहेत हे जरी सत्य असलं तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याला सुद्धा काही मर्यादा असते. असे बोलून त्यांनी इंधनदर वाढीचे गणित विरोधी पक्षाला समजावून सांगितले. पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवरील खर्च वजा केल्यानंतर राज्यांना ४० टक्के तर केंद्राला ६० टक्के पैसे मिळतात. त्या ६० टक्क्यांपैकीही ४२ टक्के केंद्राकडून राज्यांना परत दिले जातात. असे स्पष्टीकरण ज्योतिरादित्य शिंदें यांनी दिले आहे.

ज्योतिरादित्य शिंदेंनी महाराष्ट्रातील इंधनाच्या दरांवरुन काँग्रेसला चांगलेच सुनावले आहे. महाराष्ट्रामध्ये पेट्रोल डिझेलचे दर सर्वाधिक आहेत. संसदेत तुम्ही पेट्रोल डिझेलविषयी बोलत आहे पण तिकडे तुम्ही काहीच बोलत नाही. त्यामुळे मला फक्त एवढेच सांगायचे आहे ज्यांची स्वत:ची घरं काचेची असतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नयेत, असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसच्या खासदारांना चांगलेच सुनावले आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरुन बुधावारी संसदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या अगोदरपासूनच देशाची अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावरुन खाली उतरल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. सरकारचे अपयश लपवण्यासाठी ते कोरोनाचे आधार घेत आहेत असे काँग्रेसने म्हणले आहे. संसदेत अर्थ विधेयक २०२१ वर चर्चा सुरु करताना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोरोना साथीच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक होती. मात्र या अर्थसंकल्पामध्ये यासंदर्भात काही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही अशी टीका काँग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी केली आहे.
Read More…
‘सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं’
.Gold Price Today : खुशखबर ! सोन्याच्या भावात 800 रुपयांनी घट, जाणून घ्या आजचे दर
सचिन वाझेने ATS ला दिलेला जबाब खोटा; हिरेन यांची हत्या व्होल्वो कारमध्येच?
1 एप्रिलपासून बदलेल सर्वांची सॅलरी, जाणून घ्या मोदी सरकारचा निर्णय
एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग; नागपुरात राष्ट्रवादीचे आंदोलन