काकासाहेब शिंदे प्रकरणानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक निलंबित 

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन 

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी काल औरंगाबाद येथून काकासाहेब शिंदे नामक २८ वर्षीय युवकाने गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक अधिकच आक्रमक बनले आहेत. आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याप्रकरणी दोषी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून शिंदे यांच्या भावाला शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. तसेच गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके  आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानुसार त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

[amazon_link asins=’B07CGG26JY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’64573ff9-8f2d-11e8-b154-4905bdfb4b4f’]
दरम्यान , आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून काल म्हणजेच सोमवारी (२३जुलै) औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणानं गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चानं आंदोलन तिसऱ्या दिवशी अधिक तीव्र केलं आहे. आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिली असली, तरी यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्या आहेत.