Kalamb News | कळंब पोलिसांची उत्तम कामगिरी ! बेपत्ता चिमुकलीचा 24 तासांत लावला शोध

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Kalamb News | कळंब तालुक्यातील डिकसळ येथून ८ मे रोजी बेपत्ता झालेल्या नऊ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास कळंब पोलिसांना यश आले आहे. कळंब तालुक्यातील डिकसळ परिसरात एसटी कॉलनीत रहाणारी नऊ वर्षाची मुलगी घरापुढे खेळत असताना बेपत्ता झाली. वडिलांनी पोलिसांना घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी तीन पथके निर्माण करून तातडीने मुलीचा शोध घेतला.

कळंब तालुक्यातील डिकसळ परिसरातील एसटी कॉलनीतील मुलगी घरापुढे खेळत होती ती न सांगता निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कळंब पोलिसात रविवार दाखल झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी तीन पथके तयार केली. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. शिवाय जिथून मुलगी गायब झाली तेथील काही मजुरांची चौकशी करण्यात आली. तालुक्यातील इटकुर, वाकडी, कोठळवाडी आदी भागात पोलीसांनी तपास केला.

कळंब तालुक्यातील शिराढोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असाच प्रकार घडला होता,
त्यामुळे येथील पोलिसांनी पथके निर्माण करून मुलीच्या शोधासाठी तत्काळ तपासाची चक्रे फिरविली.
प्रथम श्वान पथक रांबोच्या मदतीने बेपत्ता मुलीचा तपास सुरवतीला घरापासून करण्यात आला.
शहरातील येरमळा रस्त्यावरील होळकर चौकापर्यत श्वान पथक थांबले त्यामुळे तपासात अडचणी आल्या.
नंतर पोलिसांनी कळंब परिसरात वेगाने तपासाची चक्रे फिरविली.
१० मे रोजी सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील यांची टीम आंदोरा दिशेने तपास करण्यासाठी गेली असता सदरील मुलगी तालुक्यातील अंदोरा येथिल पुलाखाली झोपली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

अवघ्या २४ तासांत बेपत्ता मुलीचा तपास करून सुखरूप मुलगी आई वडिलांच्या ताब्यात दिल्याने पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कळंब ठाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, सहायक पोलिस निरीक्षक अतुल पाटील, अशोक पवार, पोलीस कर्मचारी प्रशांत राऊत, शिवाजी सिरसाट,
सुलीन कोळेकर, श्री हंगे, मनोज दळवी, गणेश वाघमोडे, सादिक शेख, रवी कोरे, मिनाहज शेख, फरहनका पठाण, दिलीप व्हनडे, हबीब पठाण,
शिवाजी राऊत श्वान पथक चे ढोणे स्वप्नील सुरज कोरडे यांनी शोध घेतला. या उस्मानाबाद जिल्ह्य़ात कौतुक केले जात आहेत.

हे देखील वाचा

 

Maharashtra Crime News | पोलीस वसाहतीमध्ये गृहरक्षक तरुणीने घेतले जाळून

7th Pay Commission Update | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! अकाऊंटमध्ये क्रेडिट होतील 2 लाख रुपये,
18 महिन्याच्या DA एरियर बाबत मोठे अपडेट

CP Amitabh Gupta | आज रात्रीपासून संचारबंदीची अंमलबजावणी, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडिओ)

Zero Rupee Note In India | झीरो रुपयाची नोट छापण्याची भारतात का भासली होती गरज? जाणून घ्या कारण