Kale Padal Hadapsar Crime | पुणे : इन्स्टावर ओळख, लग्नाचे आमिष अन् अत्याचार; तरुणावर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Kale Padal Hadapsar Crime | इन्स्टाग्रामवरुन (Instagram) ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करत तिच्याशी शारिरीक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यासोबत बोलणे बंद करुन शारीरिक संबंध ठेवतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट (Nude Photos) करुन बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सन 2022 ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत काळेपडळ येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) 20 वर्षीय तरुणावर पोक्सो (POCSO Act) व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 17 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.17) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम बबन राठोड Shubham Baban Rathod (वय-20 रा. काळेपडळ, हडपसर) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506, पोक्सो अॅक्ट व अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये पीडितेची इन्स्टाग्रामवर शुभम सोबत ओळख झाली. दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. या दरम्यान शुभमने पीडितेला स्वत: जीवाचे बरेवाईट करण्याची धमकी देऊन प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. एकदिवस त्याने पीडितेला आपल्या आईला भेटवतो असे खोटे सांगून घरी बोलवून घेतले. तेथे मुलीला मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणून तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. शुभमने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. (Kale Padal Hadapsar Crime)

पीडितेने लग्नाबाबत विचारले असता तो टाळाटाळ केली. त्यानंतर शुभमने तिच्यासोबत बोलणे बंद केले.
दरम्यान, शुभमने पीडित मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवताना चोरून तिचे फोटो काढले होते.
11 एप्रिल रोजी आरोपीने काढलेला फोटो पीडित तरुणीच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन बदनामी केली.
हा प्रकार लक्षात येताच पीडित तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांनी शुभमविरुद्ध लैंगिक अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे (API Umesh Rokde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shirur Lok Sabha | अमोल कोल्हे यांनी शिरूरसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, जोरदार शक्तीप्रदर्शन (Video)

Baramati Lok Sahba | सुप्रिया सुळे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला (Videos)

Ajit Pawar NCP MLA | अजित पवारांच्या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य, सहा महिन्यानंतर महायुती तुटणार? बारणेंच्या अडचणी देखील वाढू शकतात