Homeताज्या बातम्याKalicharan Maharaj | 'कोरोनाच्या नावाखाली लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना...

Kalicharan Maharaj | ‘कोरोनाच्या नावाखाली लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस’, कालीपूर कालीचरण महाराजांची मुक्ताफळे

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची लक्षणे (Corona Symptoms) किरकोळ स्वरुपाची आहेत. कोरोना ही कोणतीही महामारी नाही. महामारीत लोक पटापट मरतात. जगात कोरोना महामारीच्या नावाखाली भीती निर्माण करुन अनेक लोक मारण्यात आले. कोरोना व जागतिक आरोग्य संघटना WHO (World Health Organization) बोगस आहेत, असे वक्तव्य कालीपूत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले. कालीपूत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

ते म्हणाले, कोरोना ही कोणतीही महामारी (Pandemic) नाही. महामारीत लोक पटापट मरतात. परंतु, कोरोनापासून वाचण्यासाठी जागितक आरोग्य संघटनेने (WHO) लस घेण्याचे आवाहन केले. ही संघटना व लस (Vaccine) तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक (Cheating) होत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनही (remedivir injection) बोगस आहे, असे आरोप कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी यावेळी केले. यापूर्वी कोरोना महामारीवर आणि लसीवर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अनेकांनी तर हा विषाणूच नसल्याची मुक्तांफळे उधळली होती. यात आता कालीपूत्र कालीचरण महाराज यांची भर पडली आहे.

 

जगात सनातन हिंदू धर्म हाच श्रेष्ठ

हिंदुत्ववादाबद्दल बोलताना ते म्हणाले, देशातील हिंदू हा भाषावाद आणि जातीयवादावर विभागलेला आहे.
संपूर्ण देशावर राज्य करायचे असेल तर सर्व हिंदुंनी एकत्र येऊन व्होट बँक (Hindu Vote Bank) तयार करावी.
देशासह जगावर हिंदू राष्ट्र व्हावे, अशी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची इच्छा होती.
जगात सनातन हिंदू धर्म हाच श्रेष्ठ आहे. परंतु हिंदू धर्मात काही विघटक आहेत. त्यांना साफ करणे गरजेचं आहे.
हा देश संपूर्ण हिंदूचा होणे गरजेचे असून ते तरुण करतील.

 

आमचा मोदींना पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदीच (PM Narendra Modi) देशाचा विकास करीत आहेत.
त्यांना आमचा पाठिंबा राहील. इतिहासात हिंदुवर झालेला अन्याय पटवून देणे गरजेचे आहे.
मात्र, अनेक हिंदू धर्मासाठी काम करणं सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करत असल्याचे त्यांनी म्हटले.

 

Web Title :- Kalicharan Maharaj | many killed under coronas name corona and who bogus Kalicharan Maharaj in sangli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dormant Bank Accounts | बँकांच्या निष्क्रिय खात्यांमध्ये पडले आहेत 26,697 कोटी रुपये, जाणून घ्या कसा करावा क्लेम

Mahek Chahal-Riddhima Pandit | अखेर ‘नागिन 6’मध्ये महक चहल आणि रिध्दिमाची एन्ट्री; नागिन बनून करणार शत्रुंचा ‘नाश’

Harshaali Malhotra | ‘बजरंगी भाईजान’ मधल्या ‘मुन्नी’नं शेअर केला व्हिडिओ, करिना कपूरच्या अंदाजामध्ये म्हणाली…

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News