Kalyan Crime | धक्कादायक ! कल्याणमध्ये भरदिवसा विवाहितेची दगडाने ठेचून हत्या

कल्याण : पोलीसनामा ऑनलाइन –  Kalyan Crime | कल्याण-पश्चिम (Kalyan Crime) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेची भरदिवसा दगडाने ठेचून हत्या (murder) करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना हायप्रोफाईल लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधारी भागातील रस्त्यावर घडली आहे. तर, हत्येचा संशय विवाहितेच्या पसार झालेल्‍या पतीवर असून पोलिसांनी त्या दिशेने तपास फिरवला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मी जनार्दन मोहिते (Lakshmi Janardhan Mohite) (वय 25, रा. सावदगाव, ता. भिवंडी) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. कल्याण- पश्चीमेकडे हायप्रोफाईल लोकवस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधारीपासून ते टिटवाळ्यापर्यंत रिंगरोडचे काम सुरु आहे. याच रस्त्यावर सोमवारी (दि. 6) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.

दरम्यान, याबाबत माहिती समजताच खडकपाडा पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. या भागातील काहींची प्राथमिक चौकशी केली. परंतु काहीही माहीती हाती लागली नाही. लक्ष्मी ही हायप्रोफाईल गांधारी परिसरातल्या सोसायट्यांमध्ये जाऊन घरकाम करून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते (Jarnadan Mohite) याने केली असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. हत्येनंतर तो बेपत्ता झालाय. या दरम्यान, मृताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मृत लक्ष्मीचा पती जनार्दन हा ताब्यात आल्यानंतरच हत्येचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे खडकपाडा पोलिस ठाण्याचे (Khadakpada Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार (Sr PI Ashok Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Kalyan Crime | Shocking! In Kalyan, a married woman was stoned to death all day long

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gravittus Foundation | तृतीयपंथीयांच्या मदतीसाठी उषा काकडे यांच्या ‘ग्रॅविटस’ संस्थेचा पुढाकार

Crime News | प्रियकरासोबत पळालेल्या तरुणीवर पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस चौकीत बलात्कार केल्याचा आरोप; प्रचंड खळबळ

Bluetooth Security | ALERT ! अँड्रॉईड फोन आणि विंडोज 10 यूजर्सला मोठा धोका! समोर आला नवीन प्रकारचा धोकादायक व्हायरस