‘सलमान ना चांगला शिकारी आहे ना ड्रायव्हर’ ‘या’ अभिनेत्याने उडवली ‘खिल्ली’

पोलीसनामा ऑनलाइन – सलमान खान  चांगला शिकारी नाही. चांगला वाहन चालक नाही. चांगला अभिनेता नाही. लेखक नाही. चांगला प्रेमी नाही आणि चांगला गायक तर बिलकूलच नाही. तरी देखील तो कसली घमेंड दाखवतो कळत नाही. अशा आशयाचे ट्विट करुन अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके याने सलमानची खिल्ली उडवली आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1252526858375217157

चित्रविचित्र आणि वादग्रस्त विधानांमुळे अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके नेहमीच चर्चेत असतो. यावेळी त्याने बॉलिवूडचा भाईजान सलमान खानवर निशाणा साधला आहे. सलमान अत्यंत घमंडी अभिनेता असल्याची टीका त्याने केली आहे. केआरके एवढ्यावरच थांबला नाही. यानंतर त्याने सलमानच्या चाहत्यांची देखील खिल्ली उडवली. जरी सलमानने संपूर्ण जगाचा विनाश केला, तरी देखील त्याचे चाहते त्याची स्तुतीच करतील. असे ट्विट त्याने केले आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटक र्‍यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही सलमान चाहत्यांनी केआरकेवर टीका देखील केली आहे.