‘तो मी नव्हेच’ , काश्मीर वक्तव्यावरून कमल हासन यांची सारवासारव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीर मधल्या हल्ल्याबाबत अभिनेते कमला हसन यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. त्यानंतर कमल हासन सोशल नेट्वर्किंग साईट्सवर ट्रोल होऊ लागले. त्यानंतर मात्र त्यांनी सारवासारव करीत आपले मत बदलले आहे. आता काश्मीरला जनमत चाचणीची गरज नसून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते कमल हासन

या मुलाखती दरम्यान बोलताना कमल हासन म्हणाले की, कमल हासन यांनी एका मुलाखतीमध्ये केंद्राच्या काश्मीरबाबतच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच सरकार काश्मीरमध्ये जनमत घेण्यासाठी का घाबरत आहे, असाही सवाल उपस्थित केला आहे. जनमत घेतल्यास काश्मीरी नागरिक भारतासोबत येऊ इच्छित असतील, पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छित असतील किंवा स्वतंत्र देश म्हणून राहू इच्छित असतील, तर ते समजेल. जनमत घेण्याचा मुद्दा अनेक संघटना उठवत आहेत. जर भारत स्वत:ला एक चांगला देश म्हणवत असेल तर अशा प्रकारची वागणूक देता कामा नये, असेही हासन यांनी म्हटले आहे.


काश्मीरमध्ये जवान मरण्यासाठी येतात असे कोणी बोलले की आपल्याला वेदना होतात. भारतीय सेनाही जुन्या फॅशनसारखी झालीय. ज्याप्रकारे जग बदलत आहे, आपण कसे ठरवू शकतो की माणूस खाण्यासाठी दुसऱ्या माणसाला मारू शकत नाही. युद्ध, वाद संपवण्याचीही एक वेळ येईल. मानवतेने गेल्या 10 वर्षात काही शिकवले नाही का.

माझी भविष्यवाणी खरी ठरतीय

जेव्हा मी मॅगझीन चालवत होतो, तेव्हा काश्मीरच्या मुद्द्यावर खूप काही लिहीले होते. आज मला रडायला येत आहे, कारण जी भविष्यवाणी मी केली होती ती प्रत्यक्ष घडत आहे. मी दुसरी कोणती भविष्यवाणी केली असती तर चांगले होते. काश्मीरमध्ये जनमत संग्रह करावा, लोकांना स्वातंत्र्य द्यावे…ते असे का करत नाहीत? त्यांनी कोणत्या गोष्टीची भीती आहे. ते देशाची फाळणी करू इच्छित आहेत बाकी काही नाही.