Kangana Ranaut | देशाचे नाव ‘भारत’ की ‘इंडिया’ या वादामध्ये कंगना राणौतची उडी; म्हणाली, “इंडिया या नावात प्रेम दाखवण्यासारखे काय आहे?…”

पोलीसनामा ऑनलाइन – Kangana Ranaut | देशाचे नाव निश्चित करण्यावरुन देशभरामध्ये नवा वाद सुरु झाला आहे. G 20 च्या आमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रपतींचा उल्लेख हा इंग्रजी भाषेमध्ये भारताच्या राष्ट्रपती (President of Bharat) असा करण्यात आला होता. यावरुन विरोधकांनी केंद्र सरकारला (Central Government) धारेवर धरले आहे. देशाचे नाव ‘इंडिया’ की ‘भारत’ (India or Bharat) या वरुन वादंग सुरु झाला असून अनेकांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ‘इंडिया’ हे नाव ब्रिटीशांनी दिले असल्याने ते आता बदलावे असे एका गटाचे मत आहे तर देशाचे नाव बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही असा एक मतप्रवाह आहे. यामध्ये आता मनोरंजन विश्वातील कलाकरांनी देखील त्यांची मते मांडण्यास सुरुवात केली आहे. या नवीन वादामध्ये बॉलीवुडची पंगा क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) हिने उडी घेतली असून तिची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे.

आपल्या देशाचे नाव ‘इंडिया’ की ‘भारत’ यावरुन राजकारण रंगताना दिसत आहे. दरम्यान बॉलीवुड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील ट्वीटवर ‘भारत माता की जय’ असे लिहित त्यांचे मत व्यक्त केले होते. आता यानंतर पंगा क्वीन कंगना राणौत हिने तिचे मत ट्वीट करत व्यक्त केले आहे. ती म्हणाली, “इंडिया या नावात प्रेम दाखवण्यासारखे काय आहे? सर्वप्रथम, त्यांना ‘सिंधू’ चा उच्चार करता येत नव्हता म्हणून त्याने त्याचे विकृत रूप ‘इंडस’ केले. मग कधी हिंदूना हिंदोस संबोधले तर कधी इंडीस हाक मारली. काही तडजोडी करून त्याचे INDIA केले, महाभारताच्या काळापासून कुरुक्षेत्राच्या महायुद्धात सहभागी झालेली सर्व राज्ये भारत नावाच्या एका खंडाखाली आले. मग ते आम्हाला इंदू-सिंधू का म्हणत होते?” असा सवाल कंगनाने उपस्थित केला आहे.

पुढे तिने लिहिले आहे की, “भारत हे नाव खूप अर्थपूर्ण आहे. भारताचा अर्थ काय? मला माहित आहे की हे आम्हाला रेड इंडियन म्हणतात कारण जुन्या इंग्रजीमध्ये इंडियन म्हणजे फक्त गुलाम. ते आम्हाला इंडियन म्हणतात कारण ब्रिटिशांनी आम्हाला दिलेली ही नवी ओळख होती. जुन्या काळातील शब्दकोषामध्येही इंडियन म्हणजे गुलाम असे म्हटले जाते. यात अलीकडे बदल करण्यात आला आहे. हे आमचे नाव नाही, आम्ही भारतीय आहोत, इंडियन नाही.” अशा शब्दांमध्ये अभिनेत्री कंगना राणौत हिने (Kangana Ranaut) तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://instagram.com/stories/kanganaranaut/3185119484547576601?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
https://instagram.com/stories/kanganaranaut/3185199700167050526?igshid=MTc4MmM1YmI2Ng==

देशाच्या नावावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. आमंत्रणपत्रिकेवर छापण्यात आलेल्या राष्ट्रपतींच्या पदावरुन हा
मुद्दा सुरु झाला आहे. येत्या विशेष संसदेच्या अधिवेशनमध्ये हा विषय मांडला जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
नागरिकांमध्ये मात्र देशाचे नाव नक्की ‘इंडिया’ की ‘भारत’(India Or Bharat Controversy) यावरुन संभ्रम निर्माण
झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mutual Fund Investments | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे होणार अधिक सुरक्षित; घोटाळे येणार आता समोर