धक्कादायक ! ‘या’ अभिनेत्रीने केली सख्ख्या भावाची हत्या अन् मृतदेहाचे तुकडे फेकले नदीत

कर्नाटक : वृत्तसंस्था –   कन्नड अभिनेत्री शनाया काटवेला हिने तिच्या सख्ख्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. राकेश काटवे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राकेशचा खून केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकण्यात आले होते. या प्रकरणी हुबळी पोलिसांनी शनाया काटवेला हिला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनायाने राकेश काटवे याची हत्या करुन त्याचा मृतदेहाचे तुकडे विविध ठिकाणी फेकले होते. या हत्येमध्ये आणखी 4 जणांचा सहभाग आहे. राकेशचे कापलेले डोके देवरागुडीहलाच्या जंगलात सापडले. तर शरीराचे बाकी तुकडे हुबळी आणि गदग रोडवर सापडले. याप्रकरणातील संशयितांची ओळख पटवली आहे. त्यामध्ये धारवाड जिल्हा पोलिसांनी आणखी 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे. अमन गिरानीवाले (19), नियाज अहमद कटिगार (21), तौसीफ चन्नापुर (21) आणि अल्ताफ मुल्ला (24) अशी नावे आहेत.

दरम्यान, शनायाला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. शनायाने आपल्या अभिनय कारकिर्दीतील सुरुवात राघवंका प्रभूद्वारा निर्देशित 2018 मध्ये चित्रपट ‘इदम प्रेमम जीवनम’ या कन्नड चित्रपटापासून केली होती.

मृतदेहाचे केले होते तुकडे

राकेश यांची हत्या त्यांच्या घरात 9 एप्रिल रोजी झाली होती. त्यावेळी शनाया आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हुबळी येथे गेली होती. आरोपीने गळा दाबून राकेशची हत्या केल्याची माहिती दिली जात आहे. नियाज अहमद आणि त्या इतर साथीदारांनी एका दिवसानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि ते शहरातील विविध ठिकाणी फेकले.