कपिलच्या रिसेप्शन पार्टीला लावली ‘या’ दिग्गज कलाकारांनी हजेरी

मुंबई : वृत्तसंस्था – कॉमेडियन कपिल शर्माच्या वेडिंग रिसेप्शनला अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. ही पार्टी २४ डिसेंबर ला कपिल ने मुंबई येथे बॉलिवूड कलाकारांसाठी दिली होती. या पार्टीत धर्मेंद्र, रेखा, अनिल कपूर, सोहेल खान, सलीम खान, टेनिसपटू सायना नेहवाल, मनोज वाजपेयी, कैलाश खेर, अनु मलिक, शेखर रावजियानी ,करण जोहर ,हरभजन सिंग  यासारखे दिग्‍गज कलाकार आणि खेळाडूंनी हजेरी लावली होती.
नुकतेच लग्न झालेले दीपिका आणि रणवीर यांनी ही या पार्टीमध्ये विशेष उपस्थिती लावली. या शियाय पार्टी मध्ये कपिलचे कॉमेडियन मित्र किक्कु शारदा, भरती, कृष्णा आणि राजू श्रीवास्तव हे देखील कपिलला शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
कपिल-गिन्नी १२ डिसेंबर रोजी जालंधरमध्‍ये विवाहबंधनात अडकले होते. लग्‍नामध्‍ये दोघांचे कुटुंबीय आणि काही नातेवाईक सहभागी झाले होते. त्‍यानंतर, सिने इंडस्ट्रीतील लोकांसाठी कपिल-गिन्नीने मुंबईमध्‍ये रिसेप्शन पार्टी ठेवली होती. याआधी लग्‍नानंतर १४ डिसेंबर रोजी कपिल शर्माने अमृतसरमध्‍ये रिसेप्शन दिले होते.