कपिल शर्मा गिन्नीचा हात मागायला गेल्यावर काय म्हणाले होते गिन्नीचे वडील 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेलेब्रिटी स्टार सध्या लग्नाचा सीजन मध्ये व्यस्थ आहेत. आजच देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिचे लग्न आहे. अशातच लग्न या रियल अॅक्शन पासून रियालिटी शोचा मास्टर कपिल शर्मा कसा दूर राहू शकतो त्याने हि आपल्या लग्नाची तारीख इंस्टाग्रामच्या माध्यमातून जाहीर करून टाकली आहे. १२ डिसेंबरला  कपिल बोहल्यावर चढत असून त्याचा हा प्रेम विवाह आहे. गिन्नी या कपिलच्या गर्ल फ्रेंडच्या घरी कपिल जेव्हा लग्नासाठी मागणी घालण्यास गेला तेव्हा तिचे वडील काय म्हणाले हे खूपच रुचीवर्धक कथानक आहे.

कपिल शर्मा एका महाविद्यालयात ऑडिशन द्यायला गेला असता त्याला त्या ठिकाणी गिन्नी चतरथ हि १९ वर्षीय सुंदर मुलगी भेटली त्यानंतर कपिल आणि गिन्नी या दोघात चांगली मैत्री झाली त्यानंतर त्या दोघात प्रेम झाले. कपिल आणि गिन्नी पहिल्यांदा  भेटले तेव्हा गिन्नी १९ वर्षाची होती आणि कपिल २४ वर्षाचा होता तसेच त्यांची पहिल्यांदा  भेट २००५ साली झाली होती.त्यानंतर त्यांचे आज तागायत प्रेम अबाधित आहे.

गिन्नीच्या घरी हात मागायला गेल्यावर नेमके काय झाले होते
कपिल शर्मा कमावता झाल्यावर गिन्नीच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेला. तेव्हा त्याच्या सोबत त्याची आई होती. लग्नासाठी गिन्नीच्या वडिलांना मागणी घालतात गिन्नीचे वडील शटअप  म्हणाले. कपिलची मागणी गिन्नीच्या वडिलांनी धुडकावून लावली. त्यानंतर  २४ डिसेंबर २०१६ रोजी कपिलने फोन करून  गिन्नीला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा कपिलला गिन्नीने लग्नाला लगेच होकार दिला.  दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांनी दोघांनी लग्नाचा मुहूर्त काढला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कपिलने त्याच्या प्रेमाची हकीकत सांगितली आहे.

कधी आहे कपिलचा विवाह
कपिलचा विवाह येत्या १२ डिसेंबर रोजी पार पडणार असून लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लग्न समारंभ पार पडल्या नंतर दोन दिवसांनी म्हणजे १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. तर टीव्ही इंडस्ट्रीतील आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील मित्रांसाठी मुंबईत दुसरे रिसेप्शन २४ डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे. कपिलच्या लग्नाची उत्सुकता आता  जगतात चांगलीच शिगेला पोहचली आहे. कपिल आणि गिन्नीचे लग्न कपिलच्या रियालिटी शो प्रमाणेच जरा हटके असू शकते असे कपिलच्या जवळच्या माणसांकडून सांगण्यात येते आहे.
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like