जेव्हा करण जोहरनं आयुष्मानला ऐकवलं – ‘आम्ही फक्त स्टार्ससोबतच काम करतो’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. अनेक किस्सेही आता समोर येताना दिसत आहेत. बॉलिवूड स्टार आयुष्मान खुरानाच्या क्रॅकिंग द कोड – माय जर्नी इन बॉलिवूड या आत्मचरित्रातील एक किस्सा सध्या सोशलवरून व्हायरल होत आहे. आयुष्मानला आलेला त्याचा अनुभव सध्या चर्चेत आहे.

सध्या आयुष्यमानच्या पुस्तकातील एका पानाचा एक स्क्रीनशॉट सोशलवर व्हायरल होत आहे. पुस्तकाच्या या पानावर आयुष्माननं लिहिलं की, करण जोहरनं त्याला त्याच्या ऑफिसचा लँडलाईन नंबर दिला होता. आयुष्मानला वाटलं की, त्याला करणच्या सिनेमातून ब्रेक मिळेल. धर्मा प्रॉडक्शनमधून त्याला लाँच केलं जाईल.

https://twitter.com/shizuka261/status/1272885827274780672

आयुष्मान पुढं सांगतो की, मी करणच्या ऑफिसमध्ये फोन केला. करण ऑफिसमध्ये नाही असं मला सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी कॉल केला असता करण कामात आहे असं सांगण्यात आलं. नंतर मात्र माझ्या स्वप्नांचा फुगाच फुटला जेव्हा मला सांगण्यात आलं की, आम्ही फक्त स्टार्ससोबतच काम करतो. आम्ही तुझ्यासोबत काम करू शकणार नाही.

आयुष्मान असंही म्हणतो की, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. परंतु मी त्याला दोष देत नाही. परंतु या गोष्टीचा विचार करतो की, रोज माझ्या सारखेच कितीतरी लोक त्यांना फोन करत असतील. आयुष्मानच्या आत्मचरित्रातील मेरी आवाज सुनो या भागातील हा स्क्रीनशॉट असल्याचं सांगत सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

खास बात अशी आहे की, आयुष्मानच्या या आत्मचरित्रावरील मुखपृष्ठावर करण जोहरनं त्याचं मनोगत लिहिलं आहे. करणनं लिहलं की, “हे आत्मचरित्र अशा एका आउटसाईडरच्या खासगी आयुष्यावर आहे ज्याला दाराच्या आत येण्यात यश मिळालं आहे. याशिवा त्यानं अशा वेगळ्या आडनावांसाठीही दार खुलं केलं आहे ज्याना दाराच्या आत येण्यास सहसा प्रवेश मिळत नाही.”