करण जोहरच्या पार्टीत दीपिका, मलायकासह इतरांकडून ‘अंमली’ पदार्थांचं ‘सेवन’ ? (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर नेहमी आपल्या घरी कलाकारांसाठी पार्टीचे आयोजन करत असतो. अलीकडे त्यांनी आपल्या घरी अशीच एक पार्टी ठेवली होती. त्याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः हा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर झाल्या नंतर दिल्लीतील शिरोमणी अकाली दलाच्या आमदारांसह अनेकांनी या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित केला आहे. या व्हिडिओतील कलाकारांनी ड्रग्ज घेतले आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. या पार्टीत रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर, विकी कौशल, वरुण धवन, त्याची गर्लफ्रेण्ड नताशा दलाल, मलायका अरोरा, शाहिद कपूर, त्याची पत्नी मीरा राजपूत, आयन मुखर्जी सहभागी होते.

View this post on Instagram

Saturday night vibes

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी दावा केला होता की या कलाकारांनी ड्रग्ज घेतले आहे. यात सर्वाधिक टीका विकी कौशलवर झाली. कारण तो जिथे बसला होता, त्याच्या शेजारीच एक पांढऱ्या रंगाची पावडर दिसत होती. शिवाय व्हिडिओमध्ये विकीने आपल्या नाकावर हात ठेवला होता. मात्र व्हिडीओ स्लो मोशनमध्ये पाहिल्यास लक्षात येते की विकी कौशलच्या शेजारी कोणतीही पांढरी पावडर नसून प्रकाश परावर्तित झाला होता. आणि हा प्रकाश वेगाने गायब होतानाही दिसतो. यावरून हे स्पष्ट होते की येथे कोणतेही पदार्थ ठेवलेले नव्हते.

व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक युझर्स आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंद सिंह सिरसा यांनीही या कलाकारांवर निशाणा साधला. आपल्या ट्विटरवर एक पोस्ट टाकत मनजिंदने लिहिले. “उडता बॉलिवूड – कल्पना विरुद्ध वास्तव. येथे पहा कशा प्रकारे बॉलिवूडचे अनेक कलाकार नशेत दिसत आहेत. जर तुम्हीही माझ्याशी सहमत असाल तर ड्रग्ज घेणाऱ्या कलाकारांविरोधात आवाज उठवा .” तर या ट्विटरमध्ये सिरसा यांनी दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, वरुण धवण, अर्जुन कपूर, करण जोहर आणि विकी कौशललाही मेन्शन केले आहे.

यानंतर मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सिरसा यांचे आरोप निराधार असल्याचे सांगत सिरसा यांना उत्तर देत ट्विट केले, ‘माझी पत्नीही या पार्टीत उपस्थित होती. तिथे कोणीही अंमली पदार्थाचा सेवन केलेला नाही. त्यामुळे खोट्या गोष्टी पसरवणे आणि ज्यांना तुम्ही ओळखताच नाही अशा लोकांना बदनाम करणे बंद करा. मला आशा आहे की, तुम्ही हिंमत करून समोर याल आणि सगळ्यांची माफी मागाल”. पण सध्या या मुद्यावर पार्टीत सहभागी असलेल्या कोणत्याही कलाकाराने अद्याप भाष्य केले नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like