खुशखबर ! ‘या’ कंपनीकडून ४ फिचर फोन लॉन्च, किंमत फक्त ७०० रूपये

नवी दिल्ली, वृत्तसंस्था –  कार्बन कंपनीने भारतीय बाजारात नवे फीचर फोन लॉन्च केले आहे, त्याची किंमत असणार आहे फक्त ७०० रुपये ते १००० रुपये. फीचर फोन बनवणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या कार्बन कंपनीने के एक्स (KX) सीरिजचे एकूण 4 फोन लॉन्च केले आहेत. KX3, KX25, KX26, KX27 या चार फोनची नावे आहेत. या सर्व फोनची किंमत अत्यंत स्वस्त असणार आहेत. महिन्याभरात हे चारही फोन भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

कार्बन kx3 फोनचा डिस्प्ले ४.५ इंच एवढा आहे तर डिजिट रिड – आऊट आणि व्हिडिओ म्युझिक प्लेअर देण्यात आला आहे. या फोनमध्ये रेकॉर्डरबरोबरच वायरलेस एफएम आणि बूम स्पीकर देण्यात आला आहे. यात ८०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. यात सेविंग मोड देखील कंपनीकडून देण्यात आला आहे.

याशिवाय कार्बन kx25 या फोनमध्ये ६.१ सेमीचा डिस्पे देण्यात आला. शिवाय १८०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. शिवाय एफएम रेडिओ, डिजिटल कॅमेरा आणि ड्युअल सीमकार्ड देण्यात आले आहे. यात ४ सुपर ब्राईट एलईडी टॉर्च देण्यात आल्या आहेत.

कार्बनच्या kx26 फोनमध्ये ६.१ सेमीचा डिस्प्ले,१४५० एमएएच बॅटरी, डिजिटल कॅमेरा देण्यात आला आहे. तर kx27 या फोनमध्ये बॅटरी बॅकअप सर्वात जास्त देण्यात आला आहे. या फोनमध्ये तब्बल १७५० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या ब्लूटूथ, व्हिडिओ, म्युझिक प्लेअर, डिजिटल कॅमेरा, एफएमची सुविधा देण्यात आली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –