करीना कपूरनं गर्लगँगसाठी ठेवली स्पेशल पार्टी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलीवुड अक्ट्रेस करीना कपूर ( Kareena Kapoor) खान आणि अ‍ॅक्टर सैफ अली खान ( Saif Ali Khan) लवकरच आपल्या नवीन घरात शिफ्ट होणार आहेत. दोघे सध्या बांद्राच्या फॉर्च्युन हाईट्समध्ये राहातात. दोघेही लवकरच आपल्या नवीन घरात प्रवेश करणार आहेत, या निमित्ताने करीना कपूरने आपल्या जुन्या घरात फेयरवेल पार्टीचे आयोजन केले. ज्यामध्ये तिच्या खास मैत्रिणी सहभागी होत्या. काही दिवसांपूर्वी करीना कपूरने आपल्या मैत्रिणींसोबतची काही छायाचित्र शेयर केली आहेत, ज्यामध्ये तिच्या सोबत करिश्मा कपूर, अमृता अरोरा, मलायका अरोरा आणि मल्लिका भट्ट दिसत आहेत. फोटोत करीना आणि तिच्या मैत्रिणी पार्टी करताना दिसत आहेत.

छायाचित्रात करीना कपूर खान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिने यलो कफ्तान परिधान केला आहे. छायाचित्रात करिश्मा कपूर, अमृता अरोरो, मलायका अरोरा आणि मल्लिका भट्ट हसताना दिसत आहेत. करीना आणि तिच्या मैत्रिणी अनेकदा सोबत दिसत असतात. त्या नेहमी आपला वेळा सोबत घालवतात. सर्वजणी सोशल मीडियावर एकमेकींचे फोटो शेयर करत असतात. या फोटोच्या अगोदर सुद्धा करीनाने एक फोटो शेयर केला होता. ज्याचे कॅपशन करीनाने रियूनायटेड दिले होते.

मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी एक छायाचित्र शेयर केले आहे. ज्यामध्ये मलायका सोबत तिची बहिण अमृता अरोरा सुद्धा दिसत आहे. छायाचित्र पाहून वाटते की दोघी खुप फनी मूडमध्ये आहेत. त्यांची ही छायाचित्रे एक तासापूर्वी शेयर केल्याचे दिसत होते, आणि ती 1 लाख वेळा पाहिली गेली होती. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने आपल्या घराचा उल्लेख केला होता, त्याने म्हटले, आमच्या नव्या घरात रिन्युएशनचे काम सुरू आहे, ज्यासाठी मी हे पहात आहे की, वस्तू कशा सोबत येत आहेत. मी माझ्या कुटुंबासोबत सध्या वेळेचा आनंद घेत आहे.