आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त करिनाने पहिल्यांदाच शेअर केला मुलाचा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा अत्यंत खास पद्धतीने दिल्या आहेत. करिनाने आपल्या दुसऱ्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले असून, महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करिना कपूरने लिहिले की, असे काहीही नाही जे तुम्ही करू शकत नाही. माझ्या प्रियजनांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. करिनाच्या मुलासह पहिल्या फोटोला अल्पावधीतच लाखो लाइक्स, कमेंट मिळाल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटीजकडून चाहत्यांपर्यंत प्रत्येकजण करिना कपूरचे कौतुक करत आहेत. तसेच कमेंट्स करून बेबीचे नाव चाहते विचारत आहेत.

आज ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे अभिनंदन करत आहेत. करिनाच्या फोटोमध्ये तिच्या मांडीवर तिचा मुलगा आहे. करिना दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने २१ फेब्रुवारी रोजी मुलाला जन्म दिला. महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या मुलाचे पहिले छायाचित्र चाहत्यांसह टाकून करिना सोशल मीडियावर झळकत आहे.

या फोटोमध्ये करिना कपूरच्या मुलाचा चेहरा दिसत नाही. परंतु करिना चित्रात बरीच खूश दिसत आहे. करिनाच्या दुसऱ्या गरोदरपणाची माहिती सैफ आली खान यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दिली हाेती. व्हायरल होत चाललेल्या एका वर्षाच्या आनंदात करिनाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा ३९५ दिवसांचा प्रवास कसा होता हे सांगितले आहे. करिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा १ वर्षाचा संपूर्ण प्रवास कसा होता हे दाखवला आहे. करिनाच्या कामाविषयी बोलताना, आगामी येणाऱ्या ती ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे.