‘बेबो’ करीनाच्या ट्रॅडिशनल फोटोशुटची सोशलवर जोरदार ‘चर्चा’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार करीना कपूर गेल्या अनेक दिवसांपासून आपला आगामी सिनेमा लाल सिंह चड्ढामुळे चर्चेत आहे. अशात करीनाचे काही फोटो समोर आले आहेत जे व्हायरल होताना दिसत आहेत. करीनानं इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत.

https://www.instagram.com/p/B8y7ba5F1Rw/

करीना कपूरनं द ब्राईडल एशिया या मॅगेझिनसाठी नवीन फोटोशु केलं आहे. या फोटोशुटमधील काही फोटो करीनानं इंसटाग्रामवरून शेअर केले आहेत. समोर आलेल्या फोटोत करीना ट्रॅडिशनल लुकमध्ये दिसत आहे. करीनाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं निळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. या ड्रेसमध्ये करीना खूपच सुंदर दिसत आहे. द ब्राई़डल एशियाच्या कवर फोटोसाठीचे तिचे हे फोटो आहेत. मॅगेझिनची ही चौथी आवृत्ती आहे.

https://www.instagram.com/p/B8y49PsFtaO/

करीनाला फॅशन आयकॉन म्हटलं जातं. नेहमीच तिचा एक वेगळा लुक समोर येताना दिसतो. चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल आणि फॅशन आवडत असते यात मात्र काहीच शंका नाही. करीना या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस आणि स्टनिंग दिसत आहे. तिची फिगरही आकर्षक दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B8yr0nXFX_p/

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय ती तख्त सिनेमातही काम करताना दिसणार आहे. हा सिनेमा 2021 मध्ये रिलीज होणार आहे. करीनाकडे लाल सिंह चड्ढा हा सिनेमाही आहे.

https://www.instagram.com/p/B8yp2paFsPp/

https://www.instagram.com/p/B8ye__lFPwG/

https://www.instagram.com/p/B8ydhMyFP6o/