अवघ्या 5 सेकंदात पत्त्यांसारखी कोसळली इमारत, पाहा व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कर्नाटकातील बंगळुरू इथे मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. ही धक्कादायक घटना कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

बांधकाम सुरू असेलेल्या मागच्या बाजूला तीन मजली इमारत कोसळली आहे. व्हिडीओमध्ये संपूर्ण इमारत एका विशिष्ट अँगलने खाली कोसळली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये पावसाने धुमशान सुरू आहे. त्यामुळे कुठे भूस्खलन तर कुठे इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिसरात इमारतीचे काम सुरू होते.

दरम्यान या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. आजूबाजूला सुरू असणार्‍या कामामुळे ही इमारत कोसळली का असा सवालही उपस्थित केला जात आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.