कर्नाटक : येडीयुरप्पा यांच्या ‘फ्लोअर टेस्ट’पुर्वीच विधानसभा अध्यक्षांनी १४ आमदारांना ठरवले अपात्र

बंगळुर : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानतंर मोठ्या राजकीय नाटकानंतर भाजपची सत्ता आली. बी. एस. येडियुरप्पा यांनां मुख्यमंत्री पद देण्यात आले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांच्या फ्लोर टेस्टवेळी विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी मोठा निर्णय दिला आहे. राजीनामा दिलेल्या १४ आमदारांचे सदस्यत्व रद्द केले आहे. ११ काँग्रेसचे आणि जनता दल सेक्युलरचे ३ आमदारांचा यात समावेश होता. तसंच यापूर्वी ३ आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे आता एकूण १७ आमदारांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

आता सदस्यत्व रद्द केलेले काँग्रेसचे बैराठी बसवराज, मुनिरत्न, एसटी सोमशेखर, रोशन बेग, आनंद सिंह, एमटीबी नागराज, बी सी पाटिल, प्रताप गौड़ा पाटील, डॉ. सुधाकर, शिवराम हेब्बार, श्रीमंत पाटिल हे आमदार आहेत. तर के. गोपालैया, नारायण गौड़ा, ए एच विश्वनाथ हे जेडीएसचे आमदार आहेत. या आमदारांना अपात्र घोषित केल्या नंतर विधानसभा अध्यक्ष स्पीकर रमेश कुमार यांनी मी कोणताही ड्रामा न करता योग्य पद्धतीने निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आता १७ आमदार अपात्र झाल्यानंतर कर्नाटक विधानसभेतील आमदारांचा आकडा २२४ होता तो २०७ वर आला आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठीचा आकडा १०४ आमदारांचा झाला आहे. सध्या भाजपला १०५ आमदारांनी समर्थन दिले आहे. तर मागे झालेल्या फ्लोर टेस्टमध्ये काँग्रेसला त्यांचे ९९ आणि जेडीएस, इतर पक्षाचे मिळून १०५ आमदारांचे समर्थन होते. हा निर्णय भाजपसाठी दिलासाच असू शकते.

आरोग्यविषयक वृत्त –