धक्कादायक ! एकाच खड्ड्यात पुरले तब्बल 8 ‘कोरोना’बाधितांचे मृतदेह, सर्वत्र खळबळ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यात आरोग्य कर्मचार्यांनी कोरोनाबाधितांचे शव अयोग्यरित्या दफन केल्याच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एकाच खड्ड्यात 8 शव दफन केल्याचे दिसत आहे. दरम्यान, घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकार्‍याने सांगितले आहे.

पीपीई किट घातलेले कर्मचारी जवळच उभ्या असलेल्या वाहनातून मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. त्यानंतर ते एका मागोमाग एक आठ मृतदेह एक मोठ्या खड्ड्यात टाकत होते. यूट्यूबवर व्हिडीओ पोस्ट करणार्‍या व्यक्तीने असा दावा केला की ही घटना बल्लारी जिल्ह्यातील आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, मृतांना अशी वागणूक का दिली जात आहे ? असा सवाल विचारला जात आहे. तर, काहींनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. जनता दल पक्षाने ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड केला आहे. यात त्यांनी सावध राहा, जर तुमच्या घरातल्या कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास भाजप सरकार कर्नाटकमध्ये असे मृतदेह फेकून देत आहे, असे म्हणत सरकारवर टीका केली आहे.