कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

बंगळुरू : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या १५ आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यावर निर्णय होईपर्यंत कर्नाटकात राष्ट्रपती लागू होण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच भाजपकडून सरकार स्थापनेसाठी लवकर दावा करण्यात येत नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्याने गुरुवारी या संबंधी माहिती दिली.

राष्ट्रपती शासनाची शिफारस करू शकतात राज्यपाल

भाजपचे राज्य प्रवक्ता जी. मधुसूदन यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्ष बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याचा स्विकार करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी जास्त वेळ घेतल्यास राज्यपाल वजुभाई वाला राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करू शकतात. अशा परिस्थितीत आम्ही सरकार स्थापन करण्याचा दावा आम्ही करू शकत नाहीत. पक्षाने काढलेला व्हीप आदेशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस काँग्रेस आणि जेडीएसने केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्ष पक्षबदल कायद्यानुसार बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. न्यायालयाने असंही म्हटलं होतं की बंडखोर आमदारांना सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.

 

आरोग्यविषयक वृत्त