भाजपचे ‘हे’ मंत्री अडकले सेक्स सीडी कांडमध्ये; काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकच्या राजकारणात एका सेक्स सीडीच्या मुद्यावरून गोंधळ सुरु आहे. यामध्ये आरोप असलेले जलसंधारणमंत्री रमेश जारकीहोली यांनी एका महिलेला नोकरी देण्याचा आमिष दाखवत लैंगिक शोषण केले. या प्रकरणाची सेक्स सीडीसमोर आल्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला. सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लाहल्ली यांनी याप्रकरणी रमेश जारकीहोली यांच्यावर आरोप केले आहेत.

काँग्रेसने ही सेक्स सीडीसमोर आल्यानंतर भाजपवर टीका केली. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना रमेश जारकीहोली यांचा तातडीने राजीनामा घ्यायला हवा. याप्रकरणी एफआयआर दाखल करायला हवी. हे सरकार सर्वात भ्रष्ट आहे, असे म्हटले. तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही या सेक्स रॅकेटवर भाष्य केले. ते म्हणाले, हे फक्त सेक्स स्कँडल नाही तर व्हिडिओमध्ये मंत्र्याने म्हटले, की सीएम भ्रष्ट आहेत. मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला हवे. आता चेंडू त्यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे आता प्रतिक्षा करूया मुख्यमंत्री काय करतील. मला वाटतं भाजप समजूतदार आहे. ते योग्य निर्णय घेईल.

दरम्यान, काँग्रेस आमदार रिजवान अरशद यांनी सांगितले, की रमेश जारकीहोली यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवायला हवे. तसेच त्यांच्यावर गुन्हेगारी कारवाई सुरु करायला हवी. त्यांनी एका महिलेला नोकरीचे आमिष दाखवले होते. मंत्र्यांनी त्यांच्या पदाचा वापर केला. त्यांनी वैयक्तिकरित्या काम केले नाही तर त्यांनी मंत्री म्हणून हे सर्व केले.